Homeव्हिडिओ बातम्याअजितदादांची शेवटची ओळखही 'घड्याळा 'नेच विमान अपघातानंतर जळालेल्या मृतदेहासोबतही 'चिन्ह' ...
अजितदादांची शेवटची ओळखही ‘घड्याळा ‘नेच विमान अपघातानंतर जळालेल्या मृतदेहासोबतही ‘चिन्ह’ जनतेच्या मनातील ‘मुख्यमंत्री’ अजितदादा मायभूमीतच अखेरचा श्वास…!
अजितदादांची शेवटची ओळखही ‘घड्याळा ‘नेच
विमान अपघातानंतर जळालेल्या मृतदेहासोबतही ‘चिन्ह’
जनतेच्या मनातील ‘मुख्यमंत्री’ अजितदादा
मायभूमीतच अखेरचा श्वास…!

—-
जामखेड प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेनंतर चिन्ह घड्याळ ही ओळख निर्माण झाली अन् उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांचा सर्वाधिक मोठा राजकीय कार्यकाल या घड्याळासोबतच राहिला. गेल्या २०२३ मध्ये राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही तो राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ त्यांच्यासोबत राहिले. ते घड्याळ त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम राहिल्याच योगायोग दिसून आला. अजितदादांची विमान अपघाताने अकाली एक्झिट झाली. त्या अपघातात अजितदादांसह पाचजणांचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत असल्याने ओळखणे अवघड होते. पण नियतीचा क्रूर योगायोग पहा, त्यांच्या हातातील घड्याळ अन् जवळच्या घड्याळ चिन्हामुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीला जाताना त्यांच्या चार्टर्ड विमानाला अपघात झाला. अपघातानंतर विमानाला आग लागली. त्यात त्यांच्या निधनाने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. कामाचा माणूस हरपल्यानं हळहळ व्यक्त होत आहे.
जनतेच्या मनातील ‘मुख्यमंत्री’ अजितदादा
———–
सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहण्याचा विक्रम अजित पवारांच्या नावे आहे. अर्थमंत्री म्हणून काम करतांना सक्षमपणे प्रशासनावर पकड असलेला, जनतेच्या प्रश्नांची जाण असलेला नेता हरपल्याची भावना सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.भलेही सहावेळा उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी विक्रमी काम केले अन् त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न दुर्दैवाने पुर्णत्वास जाऊ शकले नाही. पण जनतेच्या मनातील कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री म्हणून अढळ स्थान निर्माण केले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनानं महाराष्ट्र शोकसागरात लोटला गेला आहे. सकाळी सव्वा आठच्या सुमारास मुंबईहून बारामती या त्यांच्या मतदारसंघात जाण्यास निघाले. सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने त्यांची सभा होती. त्याची जोरदार तयारीही करण्यात आली होती. त्यादृष्टीने पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांची वाटही पहात होते. पण सुमारे सकाळी ८.४५ च्या सुमारास त्यांचे चार्टर्ड प्लेन बारामतीच्या रन वेपर्यंत पोहोचले होते. तेथे ला लँडिंगवेळी विमानाला अपघात झाला. अपघात होताच विमानानं पेट घेतला. त्यानंतर मोठा स्फोट झाला. विमानात अजित पवारांसह पाच जण होते. यातील कोणीही वाचू शकलं नाही.
अतिशय वक्तशीर असणा-या, घड्याळ्याच्या काट्चावर चालणाऱ्या अजित पवारांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरुन पटली. अजित पवारांच्या मृत्यूवेळी हा क्रूर योगायोग पाहायला मिळाला.

———-
सन १९९९ मध्ये काँग्रेसनेत्या सोनिया गांधी यांच्या विदेशी मुद्द्यावरून नेते खा. शरदराव पवारांनी बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. पक्षाला घड्याळ चिन्ह मिळालं. त्यानुसार काका पवारांच्या खांद्याला खांदा लावून याच घड्याळासाठी अजित पवार अखेरपर्यंत झटत राहिले. याच चिन्हावर ते सहावेळा विधानसभा निवडणूक लढले आणि विजयी झाले. सन २०२३ मध्ये अजितदादा पवारांनी शरद पवारांची साथ सोडली. राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व त्यांनी स्वतःकडे घेतलं. त्यानंतरही घड्याळ चिन्ह अजित पवारांकडे राहिलं. याच त्यांच्या हातातील घड्याळ व जवळच्या घड्याळ चिन्हावरूनत्यांच्या मृतदेहाची ओळख पटावी, हा योगायोग म्हणावा लागेल.
———–
मायभूमीतच अखेरचा श्वास…!
—-
राज्यातच नव्हे तर देशभरात राष्ट्रवादी पक्ष पोहोचविण्यात शरदराव पवारांसोबतच अजितदादांचाही मोठा वाटा होता. अजितदादांनी आपल्या राजकीय कार्यकीर्दीची सुरुवात केली. तेथे कारखान्याचा संचाल क ते सन १९९१ मध्ये पहिल्यांदा खासदारपदापर्यंत पोहोचले. पहिल्यांदा काँग्रेसकडून ते निवडून आले होते. पण अवघ्या काही महिन्यांत त्यांनी लोकसभेची जागा काका शरदराव पवारांसाठी सोडली. मग अजितदादा पवार पुन्हा बारामतीतून विधानसभेत निवडून आले. सन १९९१ पासून अजित पवार बारामतीचे आमदार राहिले. राज्यभरात काम करत असताना त्यांनी बारामतीला बेस्ट बनविण्याचा प्रयत्न केला. आताही मुंबईहून परतत याच बारामतीच्या भूमीतच विमान अपघाती निधनाने अखेरचा श्वास घेतला.
पत्रकार यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!