हाँटेल मध्ये पिण्याचे पाणी मोफत द्या ; लगेच बंद बाटली ग्राहकासमोर ठेवू नका – तुकाराम मुंडें हाँटेल समोर मोफत पाणी बोर्ड लावा अन्यथा कारवाई
हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या, समोर लगेच पाण्याच्या बाटल्या ठेवू नकाः तुकाराम मुंढे
हाँटेल समोर मोफत पाणी बोर्ड लावा .
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात ‘सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे हे त्यांच्या कठोर भूमिकेमुळे आणि जनहितार्थ घेतलेल्या निर्णयांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या मुंडे यांनी हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांसाठी असे निर्देश जारी केले आहेत, ज्यामुळे सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.
आपल्या स्पष्टवक्ते आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंडे यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, नियमांचे पालन करणाऱ्या हॉटेल्सना किंवा खानावळींना घाबरण्याचे काहीच कारण नाही, परंतु जे निष्काळजीपणा करताना आढळतील त्यांना कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल. राज्याच्या ‘सुरक्षित अन्न, आरोग्यदायी महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, यावर त्यांनी भर दिला आहे .
राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, धाबे, इटरीज आणि ज्या ठिकाणी अन्न प्रक्रिया केली जाते त्यांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्याचं जर उल्लंघन केल तर त्यांना कुणीही वाचवू शकणार नाही .तसेच हॉटेल्सनी ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी हे मोफत देणं गरजेचं आहे, तसा बोर्ड
त्यांनी संमोर लावावा, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला
दिला.
राज्यातील नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावं यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडुन ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही मोहीम राबवली जात आहे. त्यासाठी सर्वांनीच नियमांची अंमलबजावणी करावी. राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर सर्व ठिकाणी ग्राहकांना पिण्यायोग्य आणि सुरक्षित पाणी
हे मोफत उपलब्ध करण्यात यावं, लगेचच
बाटलीबंद पाणी पुढे देऊ नये, जर एखाद्या ग्राहकाने
हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी
व्यतिरिक्त बाटलीबंद पाणी मागितलं तर त्याला ते द्यावं. जर याची अंमलबजावणी केली नाही तर कारवाई करण्यात येईल असा इशारा तुकाराम मुंडे यांनी दिला. ग्राहकांनी हॉटेलमध्ये आल्यानतंर त्यांना सुरक्षित पाणी, द्रवसाधन, टॉवेल, साबण देणं बंधनकारक आहे, त्यामुळे ग्राहकांचे आरोग्य सुरक्षित राहते.राज्यात ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र’ ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामध्ये आम्ही आतापर्यंत राबवलेल्या तपासण्यांमध्ये अनेक गंभीर बाबी आढळून आल्या आहेत .ज्या ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताच्या नसुन हाँटेल वाल्यांनी केवळ पैसा कमवण्याच्या उद्देशाने ग्राहकांच्या माथी मारल्या जात आहेत .
—सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र मोहीम.
———————–
तुकाराम मुंढे म्हणाले की, अन्नात कुठेही भेसळ होऊ नये यासाठी काही पावलं उचलण्यात येतात, त्याची जबाबदारी राज्याच्या एफडीए आयुक्तांवर असते. २३ जून रोजी एक आदेश काढण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इटरिज यांनी नियम पाळणे बंधनकारक असेल. अन्न व सुरक्षा मानके यानुसार त्यांनी रजिस्ट्रेशन करावं. अन्न उत्पादन मानके, २०११ याच्यासह अनेक नियमांची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे. तसेच शाळेच्या मुलांच्या सुरक्षेसाठी नियमांची अंमलबजावणी होणं आवश्यक आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!