Homeव्हिडिओ बातम्यामहाराष्ट्र शोकाकुल, अजितदादांच्या दुःखद निधनामुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर, राजकीय दुखवटा शासन निर्णय...

महाराष्ट्र शोकाकुल, अजितदादांच्या दुःखद निधनामुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर, राजकीय दुखवटा शासन निर्णय जाहीर

महाराष्ट्र शोकाकुल
अजित दादा यांच्या दुःखद निधनामुळे सार्वजनिक सुट्टी जाहीर
राजकीय दुखवटा जाहिर
शासन निर्णय
​महाराष्ट्र शासन

जामखेड प्रतिनिधी

राज्यातील ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे, त्यांना आदरंजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 28/01/2026 रोजी संपूर्ण राज्यात ‘शासकीय सुट्टी’ आणि ‘राजकीय दुखवटा’ जाहीर करण्यात येत आहे.


संपुर्ण महाराष्ट्र राज्यासाठी दूखदायी घटना घडली आहे. राजकारणातील सर्वांचे लाडके नेतृत्व दादा यांचे बारामती येथे राज्याचे विमान अपघातात दुखद निधन झाले आहे.
सामान्य प्रशासन विभाग
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक,
मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२.
यांच्या कडुन राज्यातील सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबत.
​शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे
​या निर्णयानुसार खालील गोष्टी लागू होतील:
​राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालये आज बंद राहतील.
​सर्व शैक्षणिक संस्था (शाळा आणि महाविद्यालये) बंद राहतील.
​सर्व सरकारी इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवलेले राहतील.
​आजचे सर्व नियोजित शासकीय मनोरंजन कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईहून बारामतीला येत असताना सकाळी ८:२४ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण ६ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आज दिवसभरात अजित पवार यांच्या बारामतीमध्ये चार महत्त्वाच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. या नियोजित कार्यक्रमांसाठी ते मुंबईहून विशेष विमानाने निघाले होते. बारामती विमानतळावर लँडिंगची प्रक्रिया सुरू असताना तांत्रिक बिघाडामुळे वैमानिकाचे विमानावरचे नियंत्रण सुटले.

विमान धावपट्टीवरून घसरून बाजूच्या शेतात कोसळले आणि त्याला भीषण आग लागली. या आगीत विमानाचा पूर्णपणे कोळसा झाला असून, त्यात प्रवास करणारे अजित पवार, त्यांचे स्वीय सहाय्यक, सुरक्षा रक्षक आणि वैमानिक यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. परंतु, आगीची तीव्रता एवढी मोठी होती की विमानातील कोणालाही वाचवता आले नाही.

राज्य सरकारने या घटनेनंतर सर्व शासकीय कार्यक्रम रद्द केले असून संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. डीजीसीएने या अपघाताच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे.


​महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हा आदेश जाहीर करण्यात आला आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!