Homeव्हिडिओ बातम्याअजित दादा पवार प्रेमी जामखेड तालुका यांच्या वतीने जामखेड मध्ये सर्व पक्षीय...

अजित दादा पवार प्रेमी जामखेड तालुका यांच्या वतीने जामखेड मध्ये सर्व पक्षीय शोक सभेचे आयोजन शुक्रवार दि ३० रोजी तहसील कार्यालयासमोर उपस्थित राहण्याचे आवाहन

अजित दादा पवार प्रेमी जामखेड तालुका यांच्या वतीने जामखेड मध्ये सर्व पक्षीय शोक सभेचे आयोजन
शुक्रवार दि ३० रोजी तहसील कार्यालयासमोर उपस्थित राहण्याचे आवाहन

जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर दि २९ रोजी राज्याभरातील जनसमुदायाच्या साक्षीनं बारामती येथे अंतिम संस्कार करण्यात आले. राज्याच्या राजकारणात ठाम, तडकाफडकी निर्णयक्षम नेतृत्व म्हणून ओळख असलेले अजित दादा पवार यांच्या दुःखद निधनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. ३० जानेवारी रोजी सकाळी 1१०.३० वाजता जामखेड शहरातील तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.


अजितदादा पवार यांनी अनेक वर्षे राज्याच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असून प्रशासनावर भक्कम पकड, स्पष्ट भूमिका आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने राज्यातील राजकारणासह समाजकारणातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे.


या शोकसभेत दिवंगत अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून, जामखेड तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अजितदादा पवार प्रेमी, जामखेड तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्रकार यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!