Homeव्हिडिओ बातम्याउन्हाचा तांडव /कहर वाढणार! जिल्ह्यात यलो अलर्ट, दुपारी १२ ते ४ घराबाहेर...

उन्हाचा तांडव /कहर वाढणार! जिल्ह्यात यलो अलर्ट, दुपारी १२ ते ४ घराबाहेर पडणं टाळाच ;प्रशासनाचा कडक इशारा

उन्हाचा तांडव/कहर वाढणार !

  • जिल्ह्यात यलो अलर्ट :

दुपारी १२ ते ४ घराबाहेर पडणं टाळाच;प्रशासनाचा कडक इशारा

जामखेड प्रतिनिधी

सध्या संपूर्ण राज्यात निसर्गाचे दोन टोकाचे रूप पाहायला मिळत आहे.एकीकडे काही भागांत पावसाची हजेरी असतानाच

दुसरीकडे कडाक्याचे ऊन पडत आहे.भारतीय हवामान विभागाने (आय.एम.डी.)(I.M.D.)  ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.

विशेषतः दुपारी १२ ते ४ या वेळेत सूर्याची तीव्रता सर्वाधिक असल्याने अतिशय महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडूच नका असे कडक आवाहन अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

उन्हाच्या झळा इतक्या तीव्र आहेत की, आरोग्याची विशेष काळजी घेणे आता अनिवार्य झाले आहे.

जळगाव ४४.५ अंशांवर राज्यातील तापमानाचे आकडे धडकी भरवणारे आहेत.

 जळगाव जिल्ह्याने उष्णतेचा उच्चांक गाठला असून तिथे तब्बल ४४.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यासह इतर अनेक जिल्ह्यांमध्येही पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे.

 विचित्र बाब म्हणजे, कडाक्याच्या उन्हा सोबतच काही जिल्ह्यांत पावसानेही हजेरी लावली आहे. ज्यामुळे हवेत आर्द्रता वाढून अंगाची लाहीलाही होत आहे.

#नागरिकांनी काय करावे#

तहान लागली नसली तरी दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस घ्यावे. तसेच ताक, लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबूपाणी यांचा नियमित वापर करावा. घराबाहेर पडताना छत्री किंवा टोपीचा वापर करावा. शक्य असल्यास ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकावा. प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे. उन्हापासून बचावासाठी हलके, पातळ व सुती कपडे वापरावेत. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. अशक्तपणा, डोकेदुखी, सतत घाम येणे ही उष्माघाताची लक्षणे असून चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उष्णतेच्या लाटेची माहिती रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातून नियमित घ्यावी.

नागरिकांनी काय करू नये?

दुपारी १२ ते ४ वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. उन्हात अतिकष्टाची कामे करू नयेत. तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. गडद, घट्ट व जाड कपडे घालू नयेत. दारू, चहा, कॉफी तसेच कार्बोनेटेड थंड पेये घेणे टाळावे. उच्च प्रथिनयुक्त आहार व शिळे अन्न खाऊ नये. शक्यतो उन्हाच्या वेळेत स्वयंपाक टाळावा व स्वयंपाकघरात हवा खेळती राहील यासाठी दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवाव्यात. उष्माघाताची लक्षणे दिसताच तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मदतीसाठी व आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी १०७७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!