Homeव्हिडिओ बातम्याजामखेडमधील अँड विराज जायभाय व सोनु डुचे या तरुणांचा अपघाती मृत्यू तर...

जामखेडमधील अँड विराज जायभाय व सोनु डुचे या तरुणांचा अपघाती मृत्यू तर एक जखमी माहिजळगाव अहिल्यानगर महामार्गावर गाडी पलटी होऊन भिषण अपघात श्रद्धांजलीपर दोन दिवस न्यायालयीन कामकाज बंदचा जामखेड वकीलांचा निर्णय

जामखेडमधील अँड विराज जायभाय व सोनु डुचे या तरुणांचा अपघाती मृत्यू तर एक जखमी

माहिजळगाव अहिल्यानगर महामार्गावर गाडी पलटी होऊन भिषण अपघात

श्रद्धांजलीपर दोन दिवस न्यायालयीन कामकाज बंदचा जामखेड वकीलांचा निर्णय

जामखेड प्रतिनिधी
माहिजळगाव अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या भिषण अपघातात जामखेड अँड विराज भगवान वय अंदाजे २५ व सोनु डुचे वय अंदाजे २४ या दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेने दोन्ही कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली आहे तर जामखेड परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत माहिती अशी की जामखेड येथील जेष्ठ विधिज्ञ अँड भगवान जायभाय यांचा मूलगा अँड विराज जायभाय हे पुणे शिवाजीनगर येथील न्यायालयात वकीली करत होते. मोठ्या भावाच्या लग्नाला जामखेडला आले होते. लग्नकार्य उरकुन सोनु डूचे जामखेड व पुणे येथील एक मित्र असे तीघेजण दि ११ रोजी रात्री जामखेडहून पुण्याला जाण्यासाठी ( आय २० एम एच १७ ऐझेड३२४२) या चारचाकी वाहनातुन चालले होते. महामार्गावरील आंबिलवाडी गावाजवळील वळणावर अंदाज न आल्याने भरधाव गाडी रस्ता सोडुन शेतात घूसली व पलट्या मारत गाडी उलटी झाली.

हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये विराज जायभाय व सोनु डुचे या दोघांचा मृत्यू झाला तर पूणे येथील मित्र जख्मी झाला. ज्या ठिकाणी गाडी शेतात घुसून पलटी झाली तेथील घरातील लोक अपघाताच्या आवाजाने बाहेर आले. त्यांनीच यांना गाडीतून बाहेर काढून जामखेडला संपर्क करत अपघाताची माहिती दिली. या घटनेमुळे जामखेड मधील नातेवाईक व मित्र परिवारात शोककळा पसरली आहे. दोन्ही तरूणांचे मृतदेह जामखेड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले आहेत.


मयत अँड विराज भगवान जायभाय यांना जामखेड तालुका वकील संघाने श्रद्धांजली वाहिली तसेच दूखात सहभागी होत दोन दिवस न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे वकील संघाचे अँड अमीर खान यांनी सांगितले.

जामखेड प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!