Homeव्हिडिओ बातम्याअखेर नर्स शबनम शेखला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल,लग्नाचे आमिष ;प्रेमसंबंध :नंतर...

अखेर नर्स शबनम शेखला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल,लग्नाचे आमिष ;प्रेमसंबंध :नंतर नकार इंजेक्शन घेऊन आत्महत्या ;

अखेर नर्स शबनम शेखला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

लग्नाचे आमिष दाखवून प्रेम संबध,नंतर नकार ,मानसिक शारीरिक छळ:

आरोपीला अटक कधी?

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहरातील लोंढे हाँस्पीटल येथे नर्स शबनम शेख हिने स्वतःला इंजेक्शन देऊन आत्महत्या केली होती.

आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध ठेवले.नंतर लग्नास नकार देत शारीरिक व मानसिक त्रास देत जीवे मारण्याची धमकी .असे त्रास सहन न झाल्याने आत्महत्या केली आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .दि १३.०५.२०२६ रोजी मयत शबनम शेख ची आई शायना दस्तगीर सय्यद, वय ५० वर्षे, धंदा-मजुरी, रा. पोकळेवस्ती जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते विटभट्टीवर काम करुन कुटुंबाची उपजिवीका भागवतात .

त्यांची मुलगी शबनम हिचे लग्न दि २०.०१.२०१३ रोजी कलींदर अश्रुद्दीन सय्यद, रा. भिंगार अहमदनगर यांचेसोबत झाले होते. शबनम हिस अमन, वय ११ वर्षे व मुलगी अलिया १३ वर्षे अशी दोन मुले आहेत. पती कलींदर अश्रुद्दीन सय्यद हा नेहमी शबनम ला दारु पिऊन मारहाण करुन तिचा छळ करीत असल्यामुळे दि २७.०६.२०२३ रोजी शबनम ने पतीपासून घटस्फोट घेतला होता.

तेव्हापासून शबनम मुलांसह आईवडीलांकडे राहत होती.

नंतर गेल्या चार वर्षे डॉ. फारुख यांच्याकडे तर मागील ०५ महिन्यापासून लोंढे हॉस्पीटल, जामखेड येथे नर्सची काम करीत होती. शिक्षण पुर्ण करण्यासाठी शबनम ही आष्टी येथे कॉलेजला जात होती तेव्हा तिची ओळख अली अब्दुल पठाण, रा. आष्टी याचेसोबत झाली होती. शबनम व अली पठाण यांचे मागील दोन वर्षापासून प्रेमसंबंध होते. ते दोघेजण नेहमी एकमेकांना भेटत होते. एकेदिवशी अली पठाण याने शबनम च्या आईला म्हणाला की फोनवरुन म्हणाला की तुमची मुलगी शबनम हिचेसोबत लग्न करणार आहे. तसेच मुलगी शबनम हिस मागील दोन वर्षापासून त्याने विश्वासात घेवून तिचेशी प्रेमसंबंध ठेवून, तिचे सोबत लग्न करणार आहे असे तो वारंवार म्हणाला होता.

परंतू मागील चार महिन्यापासून अली पठाण हा लग्न करण्यास टाळाटाळ करीत असल्यामुळे शबनम मानसिकदृष्टा खचली होती. तसेच तो फोन लावून शबनम ला म्हणत होता की, तु जर लग्नाचा विषय काढला तुझे तुकडे करुन फेकून देईल असे म्हणाला होता.धमकी देत होता अलीच्या त्रासामुळे शबनमची मानसिकता खचली होती.दि २३.०४.२०२६ रोजी ११.३० वा. चे सुमारास शबनम हिने लोंढे हॉस्पीटलचे बाथरुममध्ये गेली .अली अब्दुल पठाण ने तिला लग्नाचे आश्वासन देवून प्रेमसंबंध ठेवले त्यानंतर लग्न करण्यास नकार देवून दमदाटी केल्यामुळे शबनम हिने कोणतेतरी विषारी औषध इंजेक्शनने दंडात टोचून घेवून आत्महत्या केली आहे.

मयत शबनम च्या आईच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी अली पठाण विरोधात गुन्हा दाखल केला आहे . पोलिसांनी न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी वजा विनंती मयत शबनम च्या आईवडीलांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!