Homeव्हिडिओ बातम्याअतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे :पुढील काही तासांत जोरदार वारे विजांचा कडकडाट...

अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे :पुढील काही तासांत जोरदार वारे विजांचा कडकडाट पाऊसाची शक्यता :अहिल्यानगर जिल्हा यलो अलर्ट :

अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा:

पुढील काही तासांत जोरदार वारे पाऊस होण्याची शक्यता 

अहमदनगर जिल्हा रेड अलर्ट 

जामखेड प्रतिनिधी

भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज दि १५ सप्टेंबर रोजी अहिल्यानगर जिल्हयासह पूणे, बीड, सोलापूर, नाशिक आदी जिल्ह्यामध्ये जोरदार वारे, विजेचा कडकडाटासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच

पुढील ३ तासात काही ठिकाणी ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गडगडाटी वादळ येण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे सांगितले जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला. नागरिकांना सतर्क राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्हय़ात मागील दोन दिवसापासून पूर्णतः ढगाळ वातावरण असून काल रात्री जिल्ह्यात अहिल्यानगर, जामखेड, नेवासा, कोपरगाव, पाथर्डी, कर्जत तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावत मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान केलं तर अनेक ठिकाणी नद्यांनाही मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने रस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी. अतिमहत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिनि यासीन शेख 9423391215

 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!