दिघोळ येथील बस स्टँड व हनुमान मंदिर जवळील पोल विना परवानगी काढले:
लाईनमनची मनमानी
दिघोळ ग्रामस्थ विज वितरण आधिकारयांकडे करणार तक्रार
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील दिघोळ येथील बस स्टॅण्ड व हनुमान मंदिर जवळील विज लाईनचे खांब ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय काढून त्यांची जागा बदलण्यात आली आहे. सदर कामात संबधित लाईनमनची मनमानी दिसुन येत आहे.
तसेच समोरिल व्यक्तीकडून पैसे घेऊन व्यक्तिगत फायद्यासाठी खांबांची जागा बदलली. याबाबत सदर लाईनमनची तक्रार विज वितरण आधिकारी अहिल्यानगर, जामखेड तसेच खर्डा विभागाकडे लेखी तक्रार करणार असल्या
चे दिघोळ ग्रामपंचायत उपसरपंच दशरथ राजगुरू यांनी सांगितले.
गावातील कोणत्याही कामामध्ये लाईनमन मनमानी कारभार करतांना दिसून येत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाची कोणतीही परवानगी न घेता खांब काढून दुसऱ्या जागेत रोवले आहेत. तरी ग्रामपंचायतला न सांगता कोणत्या कारणाने बस स्टँड व हनुमान मंदिर परिसरातला सार्वजनिक ठिकाणचे पोल काढले याची चर्चा ग्रामस्थांमध्ये चालू आहे.
सदर मनमानी काम करणारया सुरवसे लाईनमनची चौकशी करावी व कारवाई करावी तसेच लाईनमनची बदली करावी अशी मागणी उपसरपंच दशरथ राजगुरू व ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी लेखी तक्रारींमध्ये केली आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
