एखाद्या बळी गेल्यावर जागे होण्याआधी माणुसकी जागी ठेवा
अन् काम पुर्ण करा.
ठेकेदार व प्रशासनाची अक्षम्य दुर्लक्ष
जामखेड प्रतिनिधी
बसस्थानकाच्या दोन्ही गेटसमोर रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकासाठी खोलवर मोकळ्या जागा सोडल्या आहेत. गेटसमोर एसटी बसला बसस्थानकात जाण्या येण्यासाठी यू टर्नची जागा फारच पडत आहे.
यामध्ये बस चालकाला तोल सांभाळून चालने अवघड होते त्याच वेळी समोरून आलेले वाहन नकळत त्या दूभाजकाच्या खोल खड्डयात अडकते. मोठे नूकसान होत. अशावेळी अनेकवेळा अनेक वाहन एकाच वेळी आल्याने एकमेकांवर आदळून दूखापती व वाहनांचे नूकसान होत आहे. शहरातील दूभाजक लवकर पुर्ण करावेत.
ठेकेदार व संबंधित अधिकार्यांनी नियमानूसार काही केलेले नाही किमान माणुसकी जागी . एखाद्याचे प्राण गेल्यानंतर जागे होण्याआधी माणूसकी जागी ठेवून लवकर काम करावे.
जामखेड शहरात महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट सुटले आहेत. ठेकेदार व प्रशासनाच्या अक्षम्य दिरंगाईमुळे वाहनांना व नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकासाठी सोडवलेल्या खोलवर मोकळ्या जागेत रोजच वाहन अडकतात. मोटारसायकलस्वार पडुन जखमी होत आहेत. नागरिकांनाही रस्ता ओलांडतांना जीव मुठीत धरून चालाव लागत आहे.
अनेक शालेय विद्यार्थी व नागरिक पडुन जखमी होत आहेत. या बाबींचे गांभीर्य संबधित ठेकेदार व प्रशासनाच्या आधिकारयांना अजिबात दिसत नाही.
बस स्थानकासमोर घडलेल्या अपघात नागरिकांनी तातडीने मदत केली. यावेळी रस्ता ठेकेदार व आधिकारयांना शिव्यांची लाखोली वाहिली.
महामार्गाच्या संथगतीने होत असलेल्या कामाबाबत अनेकवेळा नागरिकांनी आंदोलन निवेदन दिले. आता ठेकेदार व संबंधित अधिकारी दिसला की धरणार आणि तेथेच जाब विचारणार असे नागरिकांमधुन बोलले जात आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
