Homeव्हिडिओ बातम्यामनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं अन् सरकारने घेतला मोकळा श्वास सरकारला ९०...

मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं अन् सरकारने घेतला मोकळा श्वास सरकारला ९० दिवसांची मूदत आणि कडक इशारा मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा आंदोलकांना माघारी फिरण्याचं आवाहन

मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडलं अन् सरकारने घेतला मोकळा श्वास
सरकारला ९० दिवसांची मूदत आणि कडक इशारा

मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा आंदोलकांना माघारी फिरण्याचं आवाहन

जामखेड प्रतिनिधी

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण तूर्तास स्थगित केले आहे.

बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भल्या पहाटेच पाटोदा येथे येऊन त्यांची भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले उपोषण सोडले. गणेशोत्सवाचा काळ आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न पाहता प्रशासनाने आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी दिली नव्हती, तरीही जरांगे आपल्या हजारो समर्थकांसह मुंबईच्या मार्गावर होते.प्रकृती खालावल्यामुळे मनोज जरांगे पाटील बीडमधील पाटोदा येथे मुक्कामी होते.

अशातच सकाळी सकाळी सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या शिष्टमंडळामध्ये मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री दादा भुसे, आमदार प्रसाद लाड, आमदार सुरेश धस आणि बीडचे जिल्हाधिकारी होते. या बैठकीत मागण्या मान्य करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आणि उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

—-
दिवसांची मुदत आणि कडक इशारा
—————

मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे यांनी सरकारला ३ महिन्यांचा वेळ दिला आहे. या वेळेत सातारा गॅझेट काटेकोरपणे लागू करावे, अशी मागणी त्यांनी केली. उपोषण फक्त स्थगित करण्यात आले असून आंदोलन कायम सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. जर सरकारने या काळात कोणताही धोका किंवा चालढकल केली, तर पुन्हा एकदा संपूर्ण ताकदीने मुंबई गाठू, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.मुंबईकडे निघालेल्या समर्थकांना माघारी फिरण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

मुंबईला निघालेल्या मराठा आंदोलकांना मनोज जरांगे यांनी आपापल्या घरी जाण्याचे आवाहन केले आहे. उपोषण मागे घेतल्यानंतर आता मनोज जरांगे पाटील पुन्हा उपचार घेण्यासाठी आंतरवाली सराटीकडे निघाले आहेत. या संपूर्ण घडामोडींमुळे ऐन गणेशोत्सवात निर्माण झालेला मोठा वाद तूर्तास टळला आहे. गणपतीच्या उत्सवातच मुंबई मध्ये होणारी गर्दी ची भीती सरकार आणि प्रशासनाला होती मनोज जरांगे पाटलांनी उपोषण सोडल्यामुळे सरकार आणि प्रशासनाने मोकळा श्वास घेतला आहे .प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!