Homeव्हिडिओ बातम्याआम्ही माणसं चुकलो; पशु पक्षी मुक्या प्राण्यांवर दया कर! पाऊस दे !...

आम्ही माणसं चुकलो; पशु पक्षी मुक्या प्राण्यांवर दया कर! पाऊस दे ! भर उन्हात पावसासाठी जामखेडमध्ये मुस्लिम बांधवांची सामूहिक नमाज अन् दूआ “हे परवरदिगार, रहमत की बारीश आता फरमा आणि आम्हा सर्वांना या संकटातून वाचव !” तीन दिवस इस्तिस्का नमाज होणार आभाळाकडे डोळे, अल्लाहकडे साकडे; पावसासाठी मुस्लिम बांधवांची दुवा

आम्ही माणसं चुकलो; पशु पक्षी मुक्या प्राण्यांवर दया कर! पाऊस दे !

भर उन्हात पावसासाठी जामखेडमध्ये मुस्लिम बांधवांची सामूहिक नमाज अन् दूआ

“हे परवरदिगार, रहमत की बारीश आता फरमा आणि आम्हा सर्वांना या संकटातून वाचव !”

तीन दिवस इस्तिस्का नमाज होणार

आभाळाकडे डोळे, अल्लाहकडे साकडे; पावसासाठी मुस्लिम बांधवांची दुवा

जामखेड प्रतिनिधी

जमीन तापली ,पिकं वाळली,तलाव ,नदी नाले सुकले, पाण्यासाठी आभाळाकडे नजरा लागल्या … हे आल्लाह! आम्ही माणसं चुकीचे वागत आहोत .आम्हाला माफ कर ,मुक्या प्राण्यांवर दया कर ,पाऊस दे ….! अशी आर्त दुआ पावसासाठी करण्यात आली .
राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने शहरासह ग्रामीण भागातील नागरिक
चिंतेत सापडले आहेत.
पावसाअभावी शेतीपिकांवर जनावरांवर पाण्याचे संकट निर्माण झाले .पावसासाठी जामखेड शहरात मुस्लिम बांधवांनी पावसासाठी सामूहिक नमाज आणि प्रार्थनेचा आधार घेतला आहे.
जामखेड नगर रोडवरील मदरसा मैदानावर ‘नमाज -ए-इस्तिस्का’ आणि विशेष दुआ चे आयोजित करण्यात आले होते. पावसासाठी करण्यात येणाऱ्या या सामूहिक प्रार्थनेत मौलाना , लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक, सर्व क्षेत्रातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पावसासाठी करण्यात आलेल्या या प्रार्थनेदरम्यान सर्वजण अत्यंत आर्ततेने अल्लाहकडे याचना करताना दिसून आले. “हे परवरदिगार, रहमत की बारीश आता फरमा आणि आम्हा सर्वांना या संकटातून वाचव,” अशी सामूहिक प्रार्थना यावेळी करण्यात आली.
पावसाने दडी मारल्याने शेतकरी,व्यापारी व समस्त नागरिकांच्या जनजीवनावर त्याचा परिणाम जाणवत आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम बांधवांनी पावसासाठी केलेली ही सामूहिक प्रार्थना धार्मिक सलोखा आणि निसर्गाविषयीची सामूहिक आर्तता अधोरेखित करणारी ठरत आहे.
आता वरुणराजाने कृपा करावी आणि जामखेडसह संपूर्ण राज्यात दमदार पाऊस पडून शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळावा, अशी भावना या सामूहिक दुआमधून व्यक्त करण्यात आली.
पावसासाठी सलग तीन दिवस चालणाऱ्या या सामूहिक नमाज आणि दुआचा पहिला दिवस होता गुरूवारी सकाळी ९.३० वाजता तर शुक्रवारी दुपारी नमाज आणि दूआ होणार आहे .तरी सर्व बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे .प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!