Homeव्हिडिओ बातम्या...... म्हणे भाग्यविधाते! गळकी पाईपलाईन, शहराची झालेली अधोगती, रस्त्यांची दुरवस्था, महामार्गाचे अर्धवट...

…… म्हणे भाग्यविधाते! गळकी पाईपलाईन, शहराची झालेली अधोगती, रस्त्यांची दुरवस्था, महामार्गाचे अर्धवट काम, ना आरोग्य, ना रोजगार, ना शैक्षणिक सुविधा……… नागरिक त्रस्त :

….. म्हणे भाग्यविधाते !

शहराची झालेली अधोगती , रस्त्यांची दुरवस्था, गळकी पाइपलाइन, महामार्गाचे अर्धवट काम, ना रोजगार, ना आरोग्य, ना शैक्षणिक सुविधा,नागरिक त्रस्त….

जामखेड – यासीन शेख

जामखेडला नगरपरिषद आहे?? हे सांगणे कठिण आहे.
जामखेडला दोन आमदार आहेत हे सदैव की दूर्दैव?? हेही सांगणे कठीण आहे.
शहराची झालेली अधोगती , रस्त्यांची दुरवस्था, गळकी पाइपलाइन, महामार्गाचे अर्धवट काम, ना रोजगार, ना आरोग्य, ना शैक्षणिक सुविधा,नागरिक त्रस्त…. तरी पण कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या अभिमानाने सांगतात हे जामखेडचे भाग्यविधाते. मग शहरातील वरिल असुविधांचे दाते कोण??असा सवाल जनता विचारत आहे.

जामखेडला नगरपरिषद असतांना नऊ वर्षांत शहराची झालेली अधोगती, कोसळलेली पाणीपुरवठा व्यवस्था, गल्लीगल्लीत पसरलेली अस्वच्छता, विकास कामात झालेली अडवाआडवी, अर्धवट विकासकामे आणि उशीरा झालेला शहर विकास आराखडा त्यालाही स्थगिती, एकुणच स्थगित राहिलेला शहरविकास, शहरातच थांबलेले महामार्गाचे काम, आरोग्याच्या तीन तेरा, नगरपरिषद अंतर्गत ना आरोग्य सुविधा, ना शैक्षणिक सुविधा, ना रोजगार सुविधा, नगरपरिषद प्रशासनाकडून मिळणारी सेवा असून अडचण नसून खोळंबा अशी आहे.
नागरिकांना भोवळ आणणारया अशा समस्यांमध्ये जामखेड शहरवासीयांना रोजच्या जीवनाला सामोरे जावे लागत आहे. दोन्ही आमदारांच्या प्रमुख राजकीय गटांनी जामखेड नगरपरिषदची फक्त सत्ता उपभोगली, नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही विशेष प्रयत्न केलेले दिसत नाहीत. राज्यात सत्ता बदल झाला की नगरपरिषद सत्ता आपल्या कडे घेण्याचे राजकीय डाव कसे खेळेले गेले हे सर्व जनतेला माहिती आहे.
——-
.
शहराला पाणीपुरवठा करणारा भूतवडा तलाव भरलेला, तरीही जामखेड करांचा ‘पाणीकाळ’ कायम आहे.
वर्षेभरात शंभर दिवसांपेक्षा जास्त पाणीपुरवठा होत नाही, तरिही पूर्ण वर्षाची पाणीपट्टी घेतली जाते, पण नळातून येते ते फक्त हवा आणि प्रशासनाचे ढिसाळ नियोजन. पाणीपुरवठा योजना जुनी, पाइपलाइन गळकी ही जबाबदारी कोणाची?? कागदावरच्या दूरूस्तीच्या नावाखाली लाखो रुपये खर्च नागरिकांच्या माथी.
जामखेड शहर मोठे आहे. मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे.नोकरी, व्यवसाय, शाळा,आदी कामांच्या निमित्ताने बाहेरगावचे महिला, पूरूष, शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर शहरात येजा करतात मात्र या लोकांसाठी नगरपरिषद हद्दीत कोठेही सुलभ शौचालय नाही. याची जवाबदारी कोणाची? नागरिकांबरोबर मोठ्या प्रमाणावर भाजीपाला, धान्य, शेती औजारे, किराणा, कापड हार्डवेअर, अशा विविध वस्तुंचे मोठ्या प्रमाणावर आवक जावक होते. या आवक जावक वर नगरपरिषदकडुन कर घेतला जातो. काही वर्षापासून नगरपरिषदने कर वसूली ठेका बाहेर दिला नाही. स्वतः नगरपरिषद वसुल करत असलेल्या कराचा हिशोब कोणत्या आमदाराला दाखवला जातो की दोन आमदारांच्या मध्ये नगरपरिषद आधिकारीच हिशोब लावतात हा मोठा प्रश्न सुज्ञ नागरिकांच्या चर्चेत आहे.

जामखेड शहरातील नागरी मूलभूत सुविधांचा बोजवारा कोण कोण जवाबदार.

वाचा पुढे…

क्रमश:

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!