विद्यमान आमदार आपल्याच विश्वात, कार्यकर्ते चालले दुसरया पक्षात :कानफुक्यांमळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात अपमानजनक परस्थिती सोडू लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष उमरभाई कुरैशी यांचा राजीनामा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून सक्रिय व एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ओळख असणारे तसेच अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष उमरभाई कुरेशी यांनी नगरपरिषदेत उमेदवारी नाकारली तसेच कानफुक्यांमुळे योग्य सन्मान मिळत नसल्याने नाराजीतुन राजीनामा दिला आहे.
उमरभाई कुरैशी यांनी पत्रकार घेऊन आपला राजीनामा जाहिर केला. ऐन नगरपरिषद निवडणुकीत दिलेला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
यावेळी उमरभाई कुरैशी यांनी सांगितले की शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजपर्यंत काम केले. विविध निवडणुकांमध्ये पक्षाचे प्रमाणिक काम करत मताधिक्य नेहमीच प्रभागात मताधिक्य दिले. निष्ठेने काम केले. इतके करूनही आमच्या पक्ष निष्ठेचा उपयोग काय? मी निवडून येणार ही खात्री असताना माझ्या पत्नीला तिकीट नाकारले यामुळे माझे कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. यामुळे मी अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष पदाचा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा देत आहे.
विद्यमान आमदार सध्या काही कानफुक्या लोकांचेच ऐकतात. यातून निष्ठावंत कार्यकर्ते नाराज होतात. निष्ठावंतांना न्याय मिळत नाही. माझ्या पत्नीला कोणत्या कारणाने उमेदवारी नाकारली हे कारण सांगावे ज्यांना उमेदवारी दिली त्यांचे काम दाखवावे असे आवाहन उमर कुरेशी यांनी केले.उमरभाई कुरेशी हे सुरवातीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सदस्य होते. यांनी ग्रामपंचायत असताना व नगरपरिषद झाल्यावर निवडणूक लढवली होती पण दोन्ही वेळा अल्पशा मतांनी पराभव झाला होता. यावेळी विजय निश्चित असताना उमेदवारी नाकारली आहे. मी अपक्ष निवडून लढविणारच आहे असे पत्रकार परिषदेत सांगितले.
विद्यमान आमदार आपल्याच विश्वात पक्षातील लोक चालले दुसरया पक्षात.
RELATED ARTICLES




दोन दिवसांत पुढील राजकीय निर्णय जाहीर करीन . होत असलेल्या नगरपरिषद निवडणूकीत मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढणार आहे.
