Homeव्हिडिओ बातम्याहाय अलर्ट! उष्णतेच्या काळात सावध राहा,सुरक्षित रहा, २९ एप्रिल ते १२ मे...

हाय अलर्ट! उष्णतेच्या काळात सावध राहा,सुरक्षित रहा, २९ एप्रिल ते १२ मे या काळात उष्णतेची लाट!

हाय अलर्ट l उष्णतेच्या काळात सावध रहा… सुरक्षित रहा!

29 एप्रिल ते 12 मे 2026 या काळात भीषण उष्णतेची लाट. 

जामखेड प्रतिनिधी

वातावरणात होत असलेल्या बदलानूसार उष्णतेची लाट (Heatwave) येण्याची भीती व्यक्त केली जात आहे,

ज्यामध्ये तापमान 45°C ते 55°C पर्यंत पोहोचू शकते। हवामान विभागाने विशेषतः विदर्भ, उत्तर व मध्य भारतात या दिवसांत उच्च तापमानाचा इशारा दिला आहे। नागरिकांनी दुपारी 10 ते 3 च्या दरम्यान बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

महत्त्वाचे अलर्ट आणि सुरक्षा उपाय:
उष्णतेची लाट (Heatwave): उत्तर आणि मध्य भारतात कमाल तापमानात मोठी वाढ, 40-44°C पेक्षा जास्त तापमान जाण्याची शक्यता।
पूर्व-मध्य भारतात वादळ: काही राज्यांत उष्णतेसोबतच वादळी वारे (50-60 किमी/तास) आणि पावसाचा इशारा।


काळजी कशी घ्यावी:
दुपारी 10 ते 3: सूर्यप्रकाशात जाणे टाळा।
पाणी: तहान नसली तरीही पुरेसे पाणी प्या।
कपडे: हलके, सुती आणि फिकट रंगाचे कपडे वापरा।
सुरक्षा: डोके झाकण्यासाठी टोपी, छत्री किंवा रुमाल वापरा. 29 एप्रिल ते 12 मे दरम्यान तापमान 45°C ते 55°C पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.

विशेषतः सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळा. पुरेसे पाणी, ताक, दही, लिंबूपाणी यांसारखे द्रवपदार्थ घ्या आणि शरीर हायड्रेट ठेवा. घरात वायुवीजन ठेवा, दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवा. तब्येत बिघडल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वाहनांमध्ये लाईटर, परफ्यूम, बॅटरी उपकरणे किंवा गॅस साहित्य ठेवणे टाळा. तसेच साप, विंचू यांसारखे प्राणी थंड जागा शोधण्यासाठी घराजवळ येऊ शकतात, त्यामुळे सतर्क राहा.

स्वतःची काळजी घ्या… आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!