मोकाट जनावरांच्या मालकांनो जरा तरी त्यांची काळजी घ्या एक गाई मृत अवस्थेत आढळली,नागरिकांनी हळहळ व्यक्त केली नगरपरिषद कर्मचारयांची विल्हेवाट लावली मोकाट जनावरांचे मालक कूठे लपले.
मोकाट जनावरांच्या मालकांनो जरा तरी त्यांची काळजी घ्या
एक गाई मृत अवस्थेत आढळली.
नागरिकांनी हळहळ व्यक्त केली
नगरपरिषद कर्मचारयांची विल्हेवाट लावली
मोकाट जनावरांचे मालक कूठे लपले.
जामखेड प्रतिनिधी
सध्या जामखेड शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न मोठा त्रासदायक ठरत आहे. शहरातील मोकाट जनावरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या जनावरांचे लपलेल्या अज्ञात मालकांना नागरिकांना होणाऱ्या त्रासाचे काडीमात्र गांभीर्य नाही. भर उन्हात ही जनावरं कुठेही भटकतांना दिसत आहेत. काही काही खाण्यात येत आहे. उष्णतेचा परिणाम या जनावरांवर देखील होत आहे.
अशाच प्रकारे
दि २७ एप्रिल रोजी सायंकाळी प्रभाग क्रमांक ५ मध्ये नाथ नगर मधील रस्याच्या कडेला मोकळ्या जागेत एक गाय मृत अवस्थेत आढळून आली. कोणाची आहे कोणालाही सांगता येत नव्हते. शेवटी ती गाई अज्ञात मालकाची मोकाटच असेल. परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त करत नगरपरिषद कर्मचाऱ्यांना फोन केला. नगरपरिषद कर्मचारयांनी सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी गाय उचलण्यासाठी जेसीबी कींवा ट्रँक्टर जाऊ शकत नव्हता.
परिसरातील नागरिकांनी सांगितले की ती गाई लवकर उचला. तोंडातून काही पदार्थ बाहेर पडत आहे. दूर्गंधी येत आहे. तेव्हा नगरपरिषद कर्मचारयांनी घंटागाडी आणली त्या अरूंद रस्यावरून घंटागाडीच्या साह्याने ती गाई मुख्य रस्त्यावर आणली.नंतर तेथुन जेसीबीच्या साहाय्याने ट्रँक्टरमध्ये टाकुन विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन गेले.
यावेळी नगरपरिषद कर्मचारयांना मोठी त्रासदायक कसरत करावी लागली. मात्र त्या मोकाट गाईच्या अज्ञात मालकाला या गोष्टींचे काहीच गांभीर्य नाही.मोकाट जनावरं कुठेही फीरतांना त्यांचेही हाल होतांना दिसत आहेत.

त्यामुळे जामखेड शहरात फीरणारया मोकाट जनावरांच्या मालकांनी थोडी तरी लाज बाळगावी. या जनावरांची काळजी घ्यावी. नूसते आयजी च्या जीवावर बायजी… फुकटचंबू बाबूराव पणा कीती दिवस!
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!