Homeव्हिडिओ बातम्यासावधागिरी बाळगा : मोटारसायकल डिक्कीतुन तीन लाख चोरट्यांनी केले लंपास

सावधागिरी बाळगा : मोटारसायकल डिक्कीतुन तीन लाख चोरट्यांनी केले लंपास

सावधगिरी बाळगा :मोटारसायकल डिक्कीतुन  तीन लाख चोरट्यांनी केले लंपास, व्यापाऱ्याचे तीन लाखा चोरीला.

जामखेड प्रतिनिधी
चोरटे सावजावर कायम नजर ठेवून असतात. नजर चुकवत डल्ला मारतात. नूकताच जामखेडमध्ये एका व्यापाऱ्याला तीन लाख रुपयांचा फटका बसला आहे.
बँकेतुन काढलेले तीन लाख रुपये स्कुटीच्या डीक्कीत ठेवले होते. स्कुटी दुकानासमोर लावुन दूकानात गेले. थोडावेळ गिऱ्हाईक पाहुन ते डिक्डीतील पैसै पुन्हा दुसऱ्या बँकेत घेऊन जायचे होते. मात्र दुकानासमोरुन अज्ञात चोरट्याने या डीक्कीत ठेवलेल्या तीन लाख रुपयांवर डल्ला मारला. याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची घटना शुक्र दि 10 रोजी वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की फीर्यादी अभय आशोक शिंगवी, वय 47 वर्षे, हे शुक्रवार दि 10 आंक्टो रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास स्टेट बँक जामखेड येथे गेले व त्यांनी चेक द्वारे साडेतीन लाख रुपये काढले. त्या मधील पन्नास हजार रुपये खिशात ठेवले व उर्वरित तीन लाख रुपये मोटारसायकल स्कुटी क्रमांक МН.16 СТ. 6278 च्या डीक्कीमध्ये ठेवले होते.यानंतर फिर्यादी शिंगवी हे आपल्या जयहिंद चौक येथील चष्म्याच्या दुकानासमोर आले. यावेळी दुकानात गिऱ्हाईक असल्याने ते गाडी दुकानासमोर लाऊन दुकानात गेले. गिऱ्हाईक झाल्यावर लगेचच ते काढलेले पैसे बीड रोड येथील नगर मर्चेंट बँकेत भरण्यासाठी गेले. यावेळी डीक्कीत ठेवलेले पैसे काढण्यासाठी त्यांनी गाडीची डीक्की उघडली मात्र डीक्कीत पैसै आढळुन आले नाहीत. त्यामुळे डीक्कीतील पैसै चोरीला गेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर फिर्यादी शिंगवी यांनी तातडीने जामखेड पोलीस स्टेशनला धाव घेतली. अभय शिंगवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे. कॉ. प्रवीण इंगळे हे करीत आहेत.
सध्या दिवाळीच्या धावपळीत नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!