Homeव्हिडिओ बातम्याजामखेड पोलिसांची मोठी कारवाई : रत्नापुर येथील शेतातुन २ लाख किमतीचे गांजा...

जामखेड पोलिसांची मोठी कारवाई : रत्नापुर येथील शेतातुन २ लाख किमतीचे गांजा झाडे पकडली : मूद्देमाल जप्त : दोन जणांवर गुन्हा दाखल

जामखेड पोलिसांची मोठी कारवाई :
रत्नापुर येथील शेतात २ लाख किमतीचे गांजाचे पकडली :मूद्देमाल जप्त :दोन जणांवर गुन्हा दाखल :

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरासह तालुक्यात अवैद्य व्यवसायांवर  पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिसांनी कारवायांचा धडका चालू आहे. जामखेड शहरात १ लाख ९८ हजार १०० रुपये किंमतीचे २८.३० गांजा  पोलिसांनी छापा टाकून पकडला आहे. दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.  जामखेड पोलिसांची हि मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे.

सदर ओले वजनाची मिश्रीत असलेला अंमली पदार्थ गांजा रत्नापुर येथील शेतात तपासादरम्यान जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाईनंतर पो. ना शामसुंदर जाधव यांच्या तक्रारीवरून जामखेड पोलीस स्टेशन गुरनं. ५४७/२०२५ एन.डी.पी.एस. कायदा १९८५ चे कलम ८ (क), २० (ब) (ii) प्रमाणे आरोपी  निलोन उर्फ कव्या धनसिंग पवार, वय ४२ वर्षे,  निशा नितीन पवार, वय ३२ वर्षे, दोन्ही रा. कुंभारगल्ली गोरोबा टॉकिन जवळ जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर यांचेविरुध्द दिनांक ०९/१०/२०२५ रोजी वर नमूद प्रचलित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्ह्याचे तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन दिवसापूर्वी केलेले गांजा कारवाईतील आरोपी अटक आरोपी  नितीन उर्फ कव्या धनसिंग पवार याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तपासादरम्यान वर वर्णन केलेल्या १लाख ९८ हजार १०० रुपये व किमतीचे गांजाचे झाडे जामखेड तालुक्यातील रत्नापुर येथील  विजय अशोक ढवळे याचे शेतातून जप्त करण्यात आली आहेत.

सदरची कारवाई  सोमनाथ धागे साो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर,  वैभव कलूबमे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर व प्रविण लोखंडे साो, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  दशरथ चौधरी, पोलीस उपनिरीक्षका किशोर गावडे, पो.हे.कों/ सोनवणे, पो.कॉ ईश्वर माने, पोकों/ भागीरथ देशमाने, पोको योगेश दळवी यांच्या पथकाने केलेली आहे.दोन दिवसांपूर्वीच जामखेड येथे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर पथकाने कारवाई केली आहे. त्या कारवाईत अटक असलेल्या आरोपींवर पून्हा या कारवाईत गून्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!