जामखेड शहर समस्यांसाठी शहर समिती स्थापन :
प्रशासनाला निवेदन; दिवाळी सूरू होण्यापूर्वी उपाययोजना करण्याची मागणी:

जामखेड प्रतिनिधी
जामखेड शहराच्या विविध समस्या व अडचणी संदर्भात नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करून आणी निवेदने देउनही समस्या जैसे थे च आहेत म्हणून शहरातील त्रस्त नागरिकांनी एकत्र येत अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी, प्रशासनाविरोधात आवाज उठवण्यासाठी बीड रोडवरील आशा भेळ जामखेड येथे दि १०/१०/२०२५ रोजी मीटिंग आयोजित केली होती.
यावेळी सुनिल जगताप यांनी या अडचणी सोडवण्यासाठी शहराची कृती समिति असावी असा ठराव मांडला याला सर्वानुमते मान्यता दिली. अध्यक्ष म्हणून बाबासाहेब चंदन यांची तर उपाध्यक्षपदी सतिश राजगुरु यांची आणि प्रफुल्ल सोळंकी यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी सल्लागार म्हणून सुनील जगताप ,ॲड .महारुद्र नागरगोजे व ॲड .ऋषीकेश डुचे यांची निवड करण्यात आली.तसेच उपस्थित नागरिक सदस्य म्हणून कार्यकारणीत समाविष्ट करण्यात आले.यावेळी अनेकांनी शहरातील समस्यांबाबत पोटतिडकने
मूद्दे मांडले.
यामध्ये
अशोकमामा पितळे, महेंद्र कदम सर,विजय राळेभात, बालाजी आजबे, रमेश कोल्हे, आकाश बाफना, बालाजी राळेभात, प्रशांत शिंदे, अनिल जगदाळे, आनंद बाफना, मनोज राउत, गणेश आजबे, भास्कर डहाळे ,नितीन मुनोत, अमोल पेचे, महेश यादव, महेश भोगल, प्रमोद गांधी, प्रतीक राळेभात ,आप्पासाहेब सोंडगे ,बाळासाहेब मुळे ,तुषार बोरा ,तुषार बोथरा आदी उपस्थित होते.
सदर समीती गठीत होताच मुख्य रस्त्यावरील धुळ , शहरातील स्वच्छता, पार्कीगसाठी जागा मोकाट जनावरे आदि प्रश्नांसंदर्भात मुख्याधिकारी जामखेड नगरपरिषद यांना निवेदन दिले तसेच मेन बाजार पेठतील गर्दी लक्षात घेता वाहतुक संदर्भात पोलीस निरिक्षक व तहसीलदार यांना व वरिल कामे दिवाळी पुर्वी करावेत अशी विनंती केली.
प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांमधुनही मागणी होत आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
