विहिरीत पडलेल्या व्यक्तीला पोलीसांनी वाचवले
खर्डा येथील सरकारी दवाखान्यामागील घटना

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सरकारी दवाखान्यामागील विहिरीत पडली आहे. घटनेची माहिती मिळताच खर्डा पोलिसांनी तातडीने सतर्क होत स्थानिक युवकांच्या सहकार्याने त्या व्यक्तीला वाचवले
दि १७जानेवारी २०२६ रोजी
जामखेड तालुक्यातील खर्डा येथील सरकारी दवाखान्यामागील विहिरीत सकाळी ११ वाजता संजय परमार (राहणार, खर्डा) हे पडले होते.
ही घटना खर्डा येथील अजय ढाळे यांना समजली . त्यांनी तात्काळ खर्डा पोलिसांना संपर्क साधला आणि पोलिसांच्या साहाय्याने संजय परमारला विहिरीतून बाहेर काढून जीव वाचवण्यात यश मिळवले.
सदर व्यक्तीला तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
अजय ढाळे व पोलिसांच्या तत्परतेमुळे विहिरीत पडलेल्या व्यक्तीचे प्राण वाचले. यामुळे खर्डा परिसरातील नागरिकांमध्ये त्यांचे जोरदार कौतुक होत आहे. विहिरीतून संजय परमारला काढण्यासाठी पोलिस नाईक संभाजी शेंडे, पोलिस कॉन्स्टेबल अशोक बडे, धनराज बिराजदार, गोरख (नाना) ढाळे, सागर पवार, बालाजी येवले व प्रमोद निकम यांनीही मदतीचा हातभार लावला.
पत्रकार यासीन शेख 9423391215
