Homeव्हिडिओ बातम्यादुभाजकाच्या खड्डयात वाहने अडकतात अपघात होतात, प्रशासनाचे दुर्लक्ष, दुभाजक लवकर पुर्ण करावेत...

दुभाजकाच्या खड्डयात वाहने अडकतात अपघात होतात, प्रशासनाचे दुर्लक्ष, दुभाजक लवकर पुर्ण करावेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संतोष नवलाखा यांचा इशारा

 

दुभाजकाच्या खड्यांत वाहने अडकतात अपघात होतात 

एखाद्या बळी गेल्यावर जागे होणार का 

ठेकेदार व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

दुभाजक लवकर पुर्ण करा अन्यथा ठेकेदार व प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा संतोष नवलाखा यांचा इशारा

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील महामार्गाच्या रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकासाठी सोडवलेल्या खोलवर मोकळ्या जागेत रोजच वाहन अडकतात. मोटारसायकलस्वार पडुन जखमी होत आहेत. नागरिकांनाही रस्ता ओलांडतांना जीव मुठीत धरून चालाव लागत आहे. अनेक शालेय विद्यार्थी व नागरिक पडुन जखमी होत आहेत. या बाबींचे गांभीर्य संबधित ठेकेदार व प्रशासनाच्या आधिकारयांना अजिबात दिसत नाही.

दि २१ जानेवारी रोजी सायंकाळी बस स्थानक परिसरातील शालीमार टायर दुकानासमोर एक एम एच ०६ए एस ८२८७ या चार चाकी वाहनाने दूभाजकात अडकल्याने तीन पलटी मारत शालिमार टायर समोर येऊन पडली. नसीब कोणीही तेथे नव्हते म्हणून जीवीत हानी टळली.

ड शहरातील महामार्गाच्या अपुर्ण कामाचा मोठा त्रास वाहन चालकांना, नागरीकांना होत आहे. बसस्थानकाच्या दोन्ही गेटसमोर रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकासाठी खोलवर मोकळ्या जागा सोडल्या आहेत. गेटसमोर एसटी बसला बसस्थानकात जाण्या येण्यासाठी यू टर्नच्या जागा सोडल्या आहेत मात्र दुभाजकासाठी सोडलेल्या जागेमधुन बस चालकाला तोल सांभाळून चालने अवघड होते. त्याच वेळी समोरून आलेले वाहन नकळत त्या दूभाजकाच्या खोल खड्डयात अडकते. वाहनांचे मोठे नूकसान होते. अशावेळी अनेकवेळा अनेक वाहन एकाच वेळी आल्याने एकमेकांवर आदळून दूखापती व वाहनांचे नूकसान होत आहे. दुखापत झालेले निमूटपणे दवाखान्यात जातात उपचार घेतात. कोणत्याही प्रकारची तक्रार करत नाहीत. ठेकेदार व संबंधित अधिकार्यांनी नियमानूसार काहीही केलेले दिसत नाही किमान माणुसकी जागी ठेवा. एखाद्याचे प्राण गेल्यानंतर जागे होण्याआधी माणूसकी जागी ठेवून ठेकेदार व आधिकारयांनी लवकर काम करावे. बस स्थानकासमोर सतत गेटवरून एसटी बस आत बाहेर येता जाता समोरून येणारी जाणारी वाहने दुभाजकाच्या खड्डयात अडकतात अपघात होतात. यावेळी रस्ता ठेकेदार व आधिकारयांना शिव्यांची लाखोली वाहिली.

रस्त्यामधील दुभाजकाच्या जागा लवकर भरून घेण्याची गरज आहे. शहरातील दूभाजक लवकर पुर्ण करावेत अन्यथा ठेकेदार व प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा यांंनी दिला आहे.

पत्रकार यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!