खर्डा येथे विधवा, परित्याक्ता आणि सुहासिनी महिलांना हळदीकुंकूंचा मान सन्मान देण्यात आला.
ग्रामीण विकास केंद्र या संस्थेचा असाही सामाजिक उपक्रम
जामखेड प्रतिनिधी
ग्रामीण विकास केंद्र संचालित भटके विमुक्त संसाधन केंद्राच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.
दि १५ जानेवारी मकरसंक्रांत दिवशी खर्डा येथे विधवा परित्यक्ता आणि सुवासिनी या खर्डा परिसरातील सर्व जाती धर्मातील महिलांनी एकत्र येऊन संविधान वाचून हळदी कुंकू आणि सुहासिनींचा वाण आणि तिळगुळ देऊन एकमेकींना सन्मान दिला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्षपदी म्हणून खर्डा गावचे सरपंच सौ. संजीवनी ताई पाटील होत्या त्या म्हणाल्या की, सर्व महिलानी विधवा परितक्तां महिलांना एकल समजू नये तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंजुषाताई लाड म्हणाल्या की, सर्व महिलांच्या पाठीमागे ग्रामीण विकास केंद्र आहे .
प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण विकास केंद्र संस्थेचे सचिव उमाताई जाधव म्हणाल्या की, कोणत्याही महिलेने कुटुंबामध्ये वाद विवाद झाल्यानंतर आईचं घर या ठिकाणी स्वतःचे माहेर समजून यावे. तसेच विशाल पवार यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तसेच सूत्रसंचालन निता इंगळे यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रस्तावना उर्मिला कवडे यांनी केले. अध्यक्षांचे सूचना मंगल शिंगाणे यांनी मांडली तर अनुमोदन लखूपती बाई गोलेकर यांनी केले.
तर आभार लक्ष्मी दराडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी रेश्मा बागवान, अयोध्या गोरे, मीना वाघे, सीमा इंगळे, आरती इंगळे, स्नेहा इंगळे, उषा शिंदे, शोभा शिंदे, लता शिंदे, छाया वाळके, शोभा ठोकळे, सोनाली पिंपळे, चंद्रकला काळे, सरस्वती लोंढे, अर्चना गोपाळघरे, प्रभावती जाधव, छोटी परी, तेजस्विनी लोंढे, रोहन पिंपळे आणि पांडुरंग शिंगांणे इत्यादी उपस्थित होते.
पत्रकार यासीन शेख 9423391215

