विजेचा शाँक लागून विज कामगाराचा मृत्यू
ठेकेदाराची लापरवाही कारणीभूत :- नातेवाईकांचा आरोप:
जामखेड प्रतिनिधी
विजेच्या मुख्य लाईनवर काम करत असतांना विज कामगाराचा शाँक लागुन मृत्यू झाल्याची दुखद घटना घडली. सदर घटनेस ठेकेदाराचा लापरवारही कारणीभूत असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे.
जामखेड तालुक्यातील लोणी फाटा येथे मुख्य लाइन जवळ पोल रोवण्याचे काम सुरू असताना ठेकेदारांने योग्य काळजी न घेतल्यामुळे ट्रॅक्टर मुख्य लाइनच्या पोल ला धडकला ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न करत असलेला कामगार गणेश दिलीप भोरे (वय ३५) रा. देवदैठण ता. जामखेड हा करंट बसून जागीच मृत्यू झाला आहे.
यामुळे देवदैठण परिसरात शोककळा पसरली आहे.
खर्डा जवळ लोणी फाटा येथे खाजगी ठेकेदार लाइटचे काम करत होते. उताराला लावलेला ट्रॅक्टर मुख्य पोलवर जाऊन धडकला नंतर यामुळे ट्रॅक्टर मध्ये करंट उतरला ट्रॅक्टर मागे घेण्यासाठी गेलेला गणेश भोरे याचा जागीच मृत्यू झाला . ट्रॅक्टर जवळ असलेले दोन कामगार सुदैवाने वाचले.
दुपारी घटना घडल्यानंतर मृतदेह नातेवाईकांनी जामखेड येथील ग्रामीण रुग्णालयात आणला यावेळी नातेवाईकांनी ठेकेदाराच्या हलगर्जीपणा व निष्काळजीपणा पणा बद्दल तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच
ठेकेदारांने मयत गणेश भोरे च्या लहान मुलांना मदत करावी अशी मागणी केली.
मृतदेह जामखेडच्या ग्रामीण रुग्णालयात आणला यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती संजय वराट, देवदैठण चे सरपंच अनिल भोरे, मनोज भोरे सह देवदैठण येथील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी शवविच्छेदन करून शोकाकुल वातावरणात देवदैठण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयत गणेश भोरे हा महावितरण चे ठेकेदार संतोष साबळे यांच्याकडे कामगार म्हणून काम करत होता.
असे नातेवाईकांनी सांगितले. तो आई वडिलांना एकुलता एक होता त्याच्या मागे आई वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
