जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाची उद्या निवड…
कोणाची वर्णी लागणार? जामखेडकरांचे लक्ष..
जामखेड प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असलेल्या जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती पदाची माळ सभापती प्रा राम शिंदे कोणाच्या गळ्यात टाकतात याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे. 
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निवडणूकीत दोन आमदारांचे राजकीय वर्चस्वाची लढाई बरोबरीत सुटली. सभापतीपदी ईश्वर चिठ्ठीने भाजपाचे शरद कारले यांची निवड झाली.
तर उपसभापती कैलास वराट यांची निवड झाली. मात्र काही दिवसांपूर्वी आ रोहित पवार यांचे समर्थक असलेले तीन संचालक सभापती प्रा राम शिंदे यांच्या गटाकडे गेले त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ कमी झाल्याने सभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. काही दिवसांपूर्वी मा.उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव १२ विरुद्ध ० अशा मतांनी मंजूर झाला होता.
त्यामुळे आमदार रोहित पवार यांना धक्का बसला होता.हा अविश्वास ठराव पारित झाल्यामुळे जामखेड मार्केट कमिटी ही पूर्णता सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या ताब्यात आली आहे.
उपसभापती पदाची निवड उद्या दिनांक ११ऑगस्ट २०२५ रोजी दिलीप तिजोरे अभ्यासी अधिकारी कृषी उत्पन्न बाजार समिती तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.
उद्या होणाऱ्या उपसभापती पदाच्या निवडीत
भाजपाकडून दोन ते तीन नावांची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.परंतु सभापती शिंदे साहेब कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात,यावरच उपसभापती पदाचा उमेदवाराचे नाव शेवटच्या क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे.
याबाबत आमदार रोहित पवार यांना मानणारे संचालक कोणती राजकीय भूमिका घेतात हे पाहणे सुद्धा औसुक्याचे ठरणार आहे.उद्या होणाऱ्या मार्केट कमिटीच्या उपसभापती पदाच्या निवडीकडे व या पदावर कोणाची वर्णी लागणार याकडे जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.प्रतिनिधीयायासीनशेख 9423391215
