१० हजार खात्यांच्या टप्प्यावर; एच यू गुगळे पतसंस्थेच्या फँमिली फंडा अभियानाला गावागावांत प्रतिसाद :
एक लाख फँमिली फंड खाते २०२५ पर्यंत उघडण्याचा एच यू गुगळे पतसंस्थेचा मानस:
जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील एच यू गुगळे पतसंस्थेची “फँमिली फंड न कळत बचत योजना” दिवसेंदिवस विस्तारत असुन जामखेड तालुक्यातील गावागावांत घरोघरी पोहचत आहे.
एच यू गुगळे पतसंस्थेचे चेअरमन रमेशभाऊ गुगळे यांचा २०२५ पर्यंत एक लाख फँमिली फंड खाते उघडण्याचा मानस आहे. त्या अनुषंगाने चेअरमन रमेशभाऊ गुगळे यांच्या संकल्पनेतून व व्यवस्थापक वैभव कुलकर्णी व सहव्यवस्थापक जुबेर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान सुरू करण्यात आले आहे.
या अभियानांतर्गत १६ जून २०२५ ला शाळा सुरू झाल्यानंतर फँमिली फंड विभागाचे मिलींद भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली रामदास गर्जे,वैशाली ढवळे यांनी जामखेड तालुक्यातील पारेवाडी, अरणगाव, वाघा, पिंपळगाव उंडा, मुंजेवाडी, मतेवाडी, जवळा, मोहळकर वस्ती, आपटी, शिऊर, धोंडपारगाव विविध गावागावांत जाऊन तेथील शाळेला भेटी दिल्या
. शाळेतील शिक्षक व गावातील लोकप्रतिनिधी प्रतिष्ठीत व्यक्तींनी मोठे सहकार्य केले. फँमिली फंड योजनेचा उद्देश असा की लहान वयातच मुलांना बचतीची सवय लागावी. बँकींग क्षेत्राशी व बँकींग व्यवहाराचे ज्ञान मिळावे. अनाठायी व अनावश्यक खर्च कमी व्हावा. खाऊच्या नावाखाली तेलकट असे आरोग्यास घातक पदार्थ खाणे बंद व्हावे. पालक व मुलांचा सुसंवाद वाढावा असे उद्देश एच यू गुगळे पतसंस्थेच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील गावागावांत घराघरात पोहोचवले जात आहे.
तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा तसेच खाजगी शाळांमधून आत्तापर्यंत फँमिली फंडचे हजारो खाते उघडण्यात आले आहेत. लवकरच १० हजाराचा टप्पा पार केला जाणार आहे असे व्यवस्थापक वैभव कुलकर्णी यांनी सांगितले.
विशेष बाब म्हणजे ज्या ज्या घरात “फँमिली फंड” खात्याचा डबा गेला आहे त्या घरात पैसे घेण्यासाठी मूलांचा पालकांशी सुसंवाद वाढलेला दिसत आहे.
ग्रामीण भागातही मोठा प्रतिसाद मिळत असून पालकवर्गात एक वेगळा आनंद दिसत आहे.
———सामाजिक उपक्रम राबविण्याचा मानस: रमेशभाऊ गुगळे —————
प्रत्येक घरातील लहान मुलांना बचतीची सवय लागण्यासाठी एच यू गुगळे पतसंस्थेने सुरू केलेल्या “फँमिली फंड” या योजनेला जामखेड तालुक्यातुन फार मोठा प्रतिसाद मिळत आहे .यामुळे पालकांचा आणि मूलांचा संवाद वाढला आहे ही आनंदाची गोष्ट आहे .आम्ही फक्त बँकींग व्यवसाय न करता सामाजिक बांधिलकी जपली जावी त्यादृष्टीने आम्ही काम करतो .
आर्थिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या महिलांना सक्षम करण्यासाठी बँकेच्या माध्यमातून आम्ही महिला बचत गटांचे काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. यामध्ये मोठ्या संख्येने महिला रोजगारासाठी विविध व्यवसाय करत आहेत .
लवकरच महिलांना व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम तसेच समाजातील सुशिक्षित, होतकरू, कष्टकरी वर्गासाठी काही वेगळे उपक्रम राबविण्याचा विचार करत आहोत असेही रमेशभाऊ गुगळे यांनी सांगितले.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
