Homeव्हिडिओ बातम्याराष्ट्रीय महामार्ग ५४८डीचे रखडलेले काम लवकर करा-: व्यापारी व नागरिकची मागणी अन्यथा...

राष्ट्रीय महामार्ग ५४८डीचे रखडलेले काम लवकर करा-: व्यापारी व नागरिकची मागणी अन्यथा उमरण उपोषण करणार जामखेडमध्ये रखडलेल्या कामामुळे सर्वाना मोठा त्रास

राष्ट्रीय महामार्ग ५४८डीचे रखडलेले काम लवकर करा-व्यापारी व नागरिकची
मागणी

अन्यथा उमरण उपोषण करणार

जामखेडमध्ये रखडलेल्या कामामुळे सर्वाना मोठा त्रास

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८डीचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले असून त्यामुळे शहरातील नागरिक, व्यापारी आणि शालेय विद्यार्थी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला असून तसाच खुला सोडण्यात आला आहे. बीड रोडवर गोठ्या प्रगाणात खडी टाकून ठेवण्यात आल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यासंदर्भात जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष महावीर बाफना, सचिव शरद शिंगवी, उद्योजक आकाश बाफना, पिंटूशेठ बोरा, सामाजिक कार्यकर्ते अभय शिंगवी, प्रफुल्ल सोळंकी, आनंद बाफना आदी नागरिक उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की, ५४८डी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या कामामुळे शहरात
धुळीचे साम्राज्य पसरले आहे. दुकानांमध्ये धूळ जाऊन व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून, नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. यामुळे व्यापारी वर्ग, शाळकरी मुले,
नहिला आणि वृद्ध नागरिक त्रस्त झाले आहेत. दरायान, काही ठिकाणी स्थानिक स्वार्थी गटांकडून ठेकेदारांना कामात अडथळा आणल्याचे देखील समोर आले आहे. शहरातील व्यापारी तथा जैन श्रावक संघाचे सेक्रेटरी शरद शिंगवी व युवा उद्योजक आकाश बाफना यांच्या पुढाकाराने साधारण १५० व्यापाऱ्यांनी या निवेदनावर सह्या केल्या आहेत.

*प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!