Homeव्हिडिओ बातम्याखर्डा येथे भरधाव वाहनाची दोन महिलांना धडक एकीचा मृत्यू तर गंभीर जखमी

खर्डा येथे भरधाव वाहनाची दोन महिलांना धडक एकीचा मृत्यू तर गंभीर जखमी

खर्डा येथे भरधाव पिकपची दोन महिलांना धडक

एकीचा मृत्यू : एक गंभीर जखमी

जामखेड प्रतिनिधी
याबाबत माहिती अशी की
खर्डा येथे भरधाव पिक अप वाहनाने दोन महिलांना जोराची धडक दिल्याने एकीचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाले आहेत.
स्मिता दिलीप रणभोर व वर्षा प्रकाश दिंडोरे या दोन महिला पहाटे फिरण्यासाठी खर्डा – भूम रोडवर फीरायला गेल्या होत्या. त्या फीरून परत घराकडे येत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या पिकप M H -14 – M H 0135 पिक अप गाडीने रणभोर व दिंडोरे यांना पाठीमागून जोराची धडक दिली.

यामध्ये स्मिता रणभोर यांचा जागेवरच मृत्यू झाला तर शेजारी चाललेल्या त्यांच्या सहकारी दिंडोरे यांनाही वाहनाची धडक बसली व त्या रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्याने गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने अहिल्यानगरला उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
मयत स्मिता रणभोर या गरिब व कष्टकरी महिला होत्या. त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय होता त्यांच्या दुःखद निधनाने खर्डा शहरावर शोककळा पसरली आहे त्यांच्या पश्चात त्यांच्या मागे पती, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
हा अपघात झाल्यानंतर पिक अप वाहनचालकाने घटनेवरून पुढे जामखेड मार्गे पलायन केले. खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंझाड यांनी तातडीने तपासाचे चक्रे फिरवून व सीसीटीव्ही कॅमेरा कैद झालेल्या गाडीचा नंबरचा तपास लावून खर्डा पोलिसांनी त्याला मिरजगाव येथून गाडीसह ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई पोलीस करत आहेत.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!