रसाळ बंधूंनी लोकांच्या पावलाला उजेड दिला – ज्ञानेश्वर नगरे महाराज
हनुमान मंदिर व स्मशानभूमी परिसरात पथदिवे व वृक्षारोपण
जामखेड प्रतिनिधी
माजी सरपंच कै. रामभाऊ रसाळ हे एक आदाराचं व्यक्तिमत्व होते.त्यांचे सुरज व धीरज दोन्ही मूलं वडीलांचा सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत आहेत. लोकं दारात दिवा लावतात तसा लोकांच्या वाटांवर दिवा लावुन रस्ता उजळवणे, लोकांच्या पावलाला उजेड देण्याचे पुण्यकर्म सुरज आणि धीरज रसाळ बंधूंनी केले आहे. पथदिवे लाऊन पालखी मार्ग उजळला, भगवंत त्यांचा मार्ग उजळेल असे प्रतिपादन ज्ञानेश्वर नगरे महाराज यांनी केले.
दिघोळ येथे आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठान च्या संकल्पनेतून हनुमान मंदिर व स्मशानभूमी परिसरात पथदिवे लोकार्पण आणि वृक्ष लागवड या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्ञानेश्वर नगरे महाराज बोलत होते. यावेळी सिताराम गडाचे मताधिपती महालिंग महाराज नगरे, खर्डा शहराच्या सरपंच संजीवनी वैजनाथ पाटील,
बांधखडकचे सरपंच केशव अण्णा वनवे, भाजपा युवा नेते बाजीराव गोपाळघरे, माजी पंचायत समिती सदस्य मनोज राजगुरू,
दिघोळ माळवाडीचे सरपंच सविता संतोष शिंदे, उपसरपंच दसरथ राजगुरू,तंटामुक्ती अध्यक्ष धीरज रसाळ, वसंत रसाळ, नानासाहेब गीते, नागनाथ उमाप, संतोष शिंदे, रविकिरण गायकवाड, हनुमान पुणे, बळीराम ढवळे, बाळासाहेब झगडे, वैजनाथ गीते, गहिनीनाथ विटकर, राहुल टाके, कांतीलाल जंगम, रामहरी आवारे, अंकुश वारे, बिबीशन पारखे, ज्ञानेश्वर रंधवे,सदाशिव हिंगमिरे, नारायण दगडे, तय्यब शेख, बापू दगडे,
व आबासाहेब प्रतिष्ठानचे सर्व सहकारी आणि दिघोळ ग्रामस्थ उपस्थित होते.
दिघोळ माळेवाडी ग्रामपंचायत व पंचक्रोशी मध्ये सातत्याने आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठान मार्फत सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याच उपक्रमापैकी दिवाळीचे औचित्य साधून एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. स्मशान भूमिकडे जाण्याच्या मार्गावर मोठे खड्डे अरूंद रस्ता झाडेझुडपे अस्वच्छ असलेल्या परिसरात स्वच्छता करत
हनुमान मंदिर परिसर ते स्मशानभूमी परिसरापर्यंत पथ दिवे व रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्ष लागवड मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली.
सर्व परिचित असलेले दिघोळ माळेवाडीचे माजी सरपंच कै. रामभाऊ रसाळ यांच्या निधनानंतर त्यांची दोन मुले सुरज आणि धीरज यांनी आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठान उभे केले व त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून चार ते पाच वर्षापासून सामाजिक उपक्रम राबवणे चालू केले.
त्यांच्या वडिलांचा समाजकारणाचा व राजकारणाचा वारसा चांगल्या पद्धतीने सांभाळत आहेत. असे संजीवनी पाटील, केशव वनवे मनोज राजगुरू आदींनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी सुरज रसाळ यांनी इथून पुढे आबासाहेब सामाजिक प्रतिष्ठान मार्फत असे सामाजिक उपक्रम राबवण्यात येतील अशी ग्वाही दिली.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
