Homeव्हिडिओ बातम्यानदितुन व्हडक्यातुन जीव घेणा प्रवास / १२ वर्षापासून ग्रामस्थांची पूलाची मागणी :...

नदितुन व्हडक्यातुन जीव घेणा प्रवास / १२ वर्षापासून ग्रामस्थांची पूलाची मागणी : लवकर दखल घ्यावी

नदीतून व्हडक्यातुन जीव घेणा प्रवास:

१२ वर्षापासून फुल बांधण्याची ग्रामस्थांची वर्षापासून मागणी:

जामखेड प्रतिनिधी

शाळेत, शेतात, गावातुन येजा करण्यासाठी पाण्याचे ड्रम एकाआड एक बांधून व्हडका तयार केला. त्यातुन दिवसा रात्री कधीही जीवघेणा प्रवास ग्रामस्थ करत आहेत.
जामखेड तालुक्यातील दिघोळ परिसरातील ब्राम्हण वाडी, दगडे वस्ती, उमाप वस्तीवरील शेतकरी, महिला, शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. लवकरात लवकर नदीवर पुल व्हावा अशी मागणी ग्रामस्थांची गेल्या १२ वर्षापासून प्रशासनाकडे मागणी आहे.

जामखेड तालुक्यातील दिघोळ परिसरातुन वांजरा नदी वाहते पुढे त्या नदीचे नाव मांजरा आहे. नंतर हीच नदी गोदावरी नदीला मिळते. नदीच्या एका बाजूने दिघोळ गावातील ब्राम्हण वाडी, दगडे वस्ती, उमाप वस्ती हे दुसऱ्या बाजूला आहे. सुमारे पाचशे लोकवस्ती या ठिकाणी आहे. येथील शेतकरी व शालेय विद्यार्थ्यांना दिघोळला ये जा करण्यासाठी एक तर बीड जिल्ह्यातील पांचग्री मार्गे १२ किलोमीटर अंतरावरून ये जा करावी लागते किंवा नदीवर प्लास्टिक पाण्याच्या टाक्यांच्यासहाय्याने केलेल्या व्हडक्यातुन शेतकरी, महिला, शालेय विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ये जा करावी लागते.

या वर्षी अतिवृष्टीमुळे गावात पाणी आले होते तसेच दोन मृतदेह पण वाहून आले होते. नदीवर पूल नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अतिवृष्टीने नुकसान पाहणी करण्यासाठी सभापती प्रा राम शिंदे, आमदार रोहित पवार, जिल्हाधिकारी, तहसीलदार आले असता प्रत्यक्ष वास्तव त्यांनी पाहिले होते. लवकरच पूल व्हावा यासाठी ग्रामस्थांनी केली आहे. पुर परिस्थिती पाहण्यासाठी ते आले होते तेव्हा त्यांनी हे वास्तव पाहिजे आहे. तरी लवकर प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

दिघोळ येथील हनुमान मंदिर व स्मशानभूमी परिसरात आबासाहेब प्रतिष्ठान मार्फत सुरज व धीरज रसाळ बंधुंनी वृक्षारोपण व पथदिवे बसविले या लोकार्पण कार्यक्रमावेळी अनेक ग्रामस्थांनी होणारा त्रास तीव्र शब्दात सांगितला.

यावेळी बांधखडक केशव वनवे, खर्डा सरपंच संजिवनी पाटील, माजी पंचायत समिती सदस्य मनोज राजगुरू, दिघोळ सरपंच सविता संतोष शिंदे, उपसरपंच दशरथ राजगुरू, धीरज रसाळ, सुरज रसाळ, वैजिनाथ गीते, मच्छिंद्र गीते, हनुमान फुने, रमेश दगडे, बालाजी उमाप, सोमिनाथ दगडे, दत्तात्रय गीते उपस्थित होते. प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!