Homeव्हिडिओ बातम्यापिंपळगाव उंडा येथे लाठ्या काठ्या गजाने मारहाण उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू एक आरोपी...

पिंपळगाव उंडा येथे लाठ्या काठ्या गजाने मारहाण उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू एक आरोपी अटक

पिंपळगाव उंडा येथे लाठ्या काठ्याने जबर मारहाण
उपचारादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू
२४ तासांत आरोपी खर्डा पोलिसांच्या ताब्यात

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील पिंपळगाव उंडा या गावात दि १२ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजता लाठ्या काठय़ांनी जबर मारहाणीची घटना घडली. या हल्ल्यात पिंपळगाव येथील शेतकरी विष्णु मुरलीधर मोहळकर व त्यांच्या मुलाला आरोपी रविंद्र अर्जुन शिंदे, कृष्णा रविंद्र शिंदे, समर्थ राजेंद्र शिंदे व सुवर्णा रविंद्र शिंदे (सर्व रा. पिंपळगाव उंडा) यांनी लाठ्या, लोखंडी गज व लाथाबुक्यांनी मारहाण जबर केली.

यामध्ये मुरलीधर दगडू मोहळकर (७०) यांना डोक्यात,छातीत व पाठीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने वार केले यामध्ये ते गंभीर जखमी झाले .त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान १५ एप्रिल रोजी दुपारी ३:१५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. याबाबत खर्डा पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५१/२०२६ मध्ये भारतीय न्याय संहिता कलम १०३ (हत्या), १०९(१), ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी विष्णू मुरलीधर मोहळकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे की आरोपींनी आमच्या घरासमोर धावत येऊन “तू कोण आम्हाला आडवणारा? आम्ही कोठूनही ट्रेन शेतात बसेन, तुला काय करायचं ते कर” असे म्हणून शिवीगाळ व धमक्या दिल्या.तसेच
रविंद्र शिंदेने लाकडी काठीने विष्णू व त्यांच्या मुलाची पाठीवर मारहाण केली तर मुरलीधर यांना डोक्यात व पाठीवर वार केले.
कृष्णा शिंदेने लोखंडी गजाने विष्णूंचे कपाळ व पाठीवर, मुलाची मानेवर मारहाण केली मुरलीधर यांना डोक्यात व छातीत हल्ला.
समर्थ शिंदेने विष्णूंच्या मुलाला लाथाबुक्यांनी मारले.
सुवर्णा शिंदेने शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी. मारहाणीचा १३ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला होता. मुरलीधर दगडु मोहळकर यांच्या मृत्यूनंतर गून्हयात हत्येचे कलम वाढवले.
वरिष्ठांच्या आदेशानुसार खर्डा पोलीस स्टेशनचे स.पो.नि.उज्वलसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक फौजदार रईस सय्यद, पोहेकॉ संभाजी शेंडे, गोकुळ इंगवले, पोकॉ. शशी म्हस्के, राहुल शिंदे, गणेश बडे यांच्या पथकाने तातडीने आरोपींचा शोध घेतला असता रविंद्र शिंदे याला २४ तासांत अटक केली. उरलेल्या तीन आरोपींचा शोध सुरू आहे.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!