Homeव्हिडिओ बातम्याबाप लेकीच्या नात्याला काळीमा, बापासह दोघांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मूलगी तीन महिन्यांची...
बाप लेकीच्या नात्याला काळीमा, बापासह दोघांचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मूलगी तीन महिन्यांची गर्भवती, बापासह कुसडगाव येथील आरोपी अटक
बाप लेकीच्या नात्याला काळीमा
अल्पवयीन मुलीवर नराधम बापासह दोघांचा बलात्कार, मुलगी तीन महिन्यांची गर्भवती
कुसडगाव येथील आरोपी अटक
जामखेड प्रतिनिधी
वासनांध बापाने पोटच्या मुलीवर अत्याचार करत बाप लेकी च्या नात्याला काळीमा फासल्याची जामखेड तालुक्यात घटना घडली आहे. एका साडेतेरा वर्षीय पिडीत अल्पवयीन मुलीवर बापाने व एका हॉटेल चालकाने बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
धक्कादायक म्हणजे पिडीत अल्पवयीन मुलगी ही तीन महीन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी मुलिचा बाप व हॉटेल चालक अशा दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असुन या प्रकरणी पोक्सो, बलात्कार यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील आनंदवाडी परिसरात पिडीत मुलगी ही आपल्या आजी, आजोबा व वडीलांसह रहात आहे. मुलीच्या आईचे एक वर्षापूर्वीच निधन झाले आहे. मुलगी संगमनेर तालुक्यातील आश्रम शाळेत शिकत आहे,
मात्र ऑक्टोंबर २०२५ रोजी दिवाळीच्या सुट्या लागल्या असल्याने पिडीत मुलगी ही आपले आजी आजोबा व वडील हे जामखेड तालुक्यातील सरदवाडी भागात ऊस तोडण्यासाठी आले होते. सुट्टीमुळे त्या ठिकाणी मुलगी देखील आली होती. या भागातील एका हॉटेलवरील नळावर पिडीत मुलगी आपल्या आजीसह पाणी आणण्यासाठी जात असे, यावेळी हॉटेल चालकाची तीच्यावर नजर पडली. मुलीचे घरचे ऊसतोडणी साठी बाहेर गेल्यावर हॉटेल चालक आरोपी जयदत्त सदाशिव कात्रजकर (उर्फ) नाना रा. कुसडगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर याने मुलीस जवळच असलेल्या मक्याच्या शेतात नेऊन तीन वेळा अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला जीवे मारून टाकेल अशी धमकी दिली.
यानंतर पिडीत मुलीचा बाप नोव्हेंबर २०२५ रोजी दिवाळी नंतर आपल्या कुटुंबासह बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सांगवी याठिकाणी
उसतोडणीसाठी आला होता. त्या ठिकाणी देखील पिडीत मुलीच्या नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवर नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ पर्यंत अनेक वेळा अत्याचार केला.
एप्रिल २०२६ मध्ये पिडीत मुलगी आपल्या संगमनेर तालुक्यातील आश्रम शाळेत वार्षीक परिक्षा असल्याने ती परिक्षा देण्यासाठी दि ९ एप्रिल २०२६ रोजी आली होती. यावेळी शाळेकडून मुलीच्या आजीला मुलीची मेडीकल टेस्ट करण्यास सांगितले. सदर मुलीचे संगमनेर ग्रामिण रुग्णालय याठिकाणी मेडीकल टेस्ट केल्यानंतर पिडीत अल्पवयीन मुलगी ही तीन महीन्यांची गर्भवती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
संगमनेर पोलीसांना या घटनेची माहिती मिळताच संगमनेर पोलीसांनी पिडीत मुलीस व बापास जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले. यानंतर सपोनि वर्षा जाधव यांनी पिडीत मुलीस विश्वासात घेऊन विचारपूस केली त्यावेळी आरोपी हॉटेल चालक जयदत्त सदाशिव कात्रजकर (उर्फ) नाना रा. कुसडगाव व मुलीचा बाप अशा दोघांची नावे निष्पन्न झाली. याप्रकरणी दोन्ही आरोपींना जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या सह त्यांच्या पथकाने दि १४ एप्रिल २०२६ रोजी रात्री बेड्या ठोकल्या.
पुढील तपास कर्जत जामखेड चे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे हे करित आहेत.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!