रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बैलगाडी उलटली. बांधखडक येथील तरुण मंडळी आहेतॅ
रस्त्यातील खड्यांमुळे बैलगाडी उलटली
बांधकाम येथील तरूण शेतकऱ्याचा मृत्यू
जामखेड प्रतिनिधी
जनावरांना बैलगाडीतुन चार घेऊन घराकडे जात असताना रस्त्यातील खड्यांमुळे बैलगाडी अंगावर उलटल्याने बांधखडक येथील तरुण शेतकर्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की मयत गणेश मधुकर चव्हाण, वय अंदाजे २८ वर्षे, रा. चव्हाण वस्ती बांधखडक ता. जामखेड हा गुरवार दि १६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास आपल्या शेतात गुरांना चारा आणण्यासाठी त्याचे चुलते बाळु गोरख चव्हाण यांच्याबरोबर गेला होता.यावेळी गणेश व त्याचे चुलते चारा बैलगाडीतुन घेऊन आपल्या चव्हाण वस्तीकडे येत असताना खैरी नदिच्या जवळील रस्त्यावरील खड्यात बैलगाडी आदळली व बैलगाडीचा टायर उडुन सदरची बैलगाडी उलटली..
या अपघातात गणेश चव्हाण हा बैलगाडी खाली दबला गेला व मेंदुला मार लागल्याने तो या अपघातात गंभीर जखमी झाला होता. तर त्याचे चुलते बाळु चव्हाण हे देखील जखमी झाले होते.
यानंतर गंभीर जखमी गणेश चव्हाण यास ग्रामस्थांनी तातडीने मोटारसायकलवर खर्डा येथील हॉस्पिटल मध्ये दाखल केले
मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तातडीने पुढील उपचारासाठी बार्शी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र गणेशचा रस्त्यातच मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. गणेश चव्हाण याची घरातील परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. त्याच्या मागे वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. गणेश यांच्या अपघाती मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्यावर रात्री सात वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
चौकट
शेतकरी गणेश चव्हाण याचा शेतात काम करित असताना अपघाती मृत्यू झाला आहे. घरातील परिस्थिती देखील हलाखीची आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबास स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत शासनातर्फे आर्थिक मदत मिळावी अशी मागणी त्याच्या नातेवाईकांनी केली आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!