दिघोळ माळेवाडी पंचक्रोशीतील उडीद सोयाबीन पिकांचे पंचनामे करावे :- सुरज रसाळ
मांजरा नदी दूधडी झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान
जामखेड प्रतिनिधी
दिघोळ जातेगाव माळेवाडी पंचक्रोशीतील पिकांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरयाःचे मोठे नुकसान झाले आहे. महसुल प्रशासनाने नूकसान झालेल्या सोयाबीन व उडीद या पिकांचे पंचनामे तातडीने करावे व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस यूवा आघाडीचे जामखेड तालुकाध्यक्ष सुरज रसाळ यांनी केली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. जामखेड तालुक्यातील दिघोळ – माळेवाडी येथील मांजरा नदीला मोठा पूर आला आहे.
नदीच्या पुराचे पाणी नदी काठावरील शेतात शिरल्याने पिकांचे नुकसान झाले तसेच दोन दिवस जोरदार पाऊस झाल्याने माळेवाडी जातेगाव दिघोळ परिसरातील शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. याठिकाणी सोयाबीन, उडीद पिकांचे शेतात पहाणी करून पिक नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्यांना मदत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे यूवा तालुकाध्यक्ष सुरज रसाळ यांनी केली आहे. 
नूकसान ग्रस्त शेतामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष पै धीरज, रसाळ उपसरपंच दशरथ राजगुरू, ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांनी शेतात जाऊन पहाणी केली.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
दिघोळ माळेवाडी जातेगाव पंचक्रोशीतील नूकसान ग्रस्त पिकांचे पंचनामे करा :- सुरज रसाळ : मांजरा नदी दूधडी झाल्याने पिकांचे अतोनात नुकसान
RELATED ARTICLES
