Homeव्हिडिओ बातम्याजामखेड शहरात गोळीबार :दोन जण जखमी :मांडीतुन गोळी आरपार :बाहेरच्या गुंडगिरिमूळे जामखेड...

जामखेड शहरात गोळीबार :दोन जण जखमी :मांडीतुन गोळी आरपार :बाहेरच्या गुंडगिरिमूळे जामखेड बदनाम

जामखेड शहरात गोळीबार एक गंभीर जखमी
मांडीतुन गोळी आरपार

बाहेरच्यां गूंडगिरिमुळे जामखेड बदनाम

जामखेड प्रतिनिधी

तुम्ही इथे लघवीला करू नका इथे लेडीज येतात असे म्हणाल्याचा राग आला आणि आरोपीने सरळ पिस्टलमधुन गोळ्या झाडल्या. या मध्ये दोन जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी अर्म अँक्टसह जीवे मारण्याची प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अदित्य बबन पोकळे वय 20 वर्षे धंदा वॉशिंग सेंटर रा. पोकळेवस्ती, जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि १ जून रोजी रात्री १० वाजता विंचरणा नदीच्या नवीन पुलावर आरोपीने रविवारी सायंकाळी दहा वाजता फिर्यादीचे अदित्य बबन पोकळे (वय 20) वर्षे रा. पोकळेवस्ती, जामखेड हे विंचरणा नदीच्या नविन पुलावर आपल्या वाशिंग सेंटर दुकानासमोर असताना तीघे जण एक चारचाकी सिल्व्हर कलरची किया सेल्टोस गाडी उभी करून दुकानासमोर लघवी (लघुशंका) करत होते. त्यांना इथे लघवी करू नका. इथे जवळ लेडीज आहेत असे म्हणाल्यावर
राग आला. त्यामुळे अदित्यला शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करत जीवे ठार मारण्याचा उद्देशाने पिस्टर मधुन तीन वेळा गोळ्या झाडल्या.याचवेळी कुणाल बंडू पवार वय 20 वर्षे हा भांडण सोडवण्यासाठी मध्ये आला असता त्याच्या पाण्याच्या मांडीला लागून गोळी आरपार गेली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आरोपी चारचाकी गाड्यांमधून फरार झाले.
पोलिसांनी जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले.
सध्या प्रकृती स्थिर आहे. घटनास्थळी पोलिसांना दोन जिवंत काडतूस व तीन गोळ्यांच्या पुंगळ्या सापडल्या आहेत.फिर्यादीवरून गु.र.नं.व कलम
जामखेड पो. स्टे गु.र.नं.293/2025 भा.न्या सं 2023 चे कलम 109,115(2), 352,3(5) सह आर्म अॅक्ट कलम 3,25 प्रमाणे (पिस्टल मधुन फायर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न) असे गून्हे दाखल करण्यात
आला आहे. यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. प्रशांत खैरे, पोलीस उपअधीक्षक उगले व पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी भेट दिली. सदर गुन्ह्य़ात वापरलेली कारच्या नंबरवरून पोलीसांनी शोध घेतला असून आरोपीच्या शोधार्थ तीन पथके रवाना केली आहेत तपास प्रगतीपथावर असल्याचे पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी सांगितले.

बाहेरील गुन्हेगारांमुळे जामखेड बदनाम
————
जामखेड मध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवणारया व दहशत निर्माण करणारया घटना प्रामुख्याने बाहेरील गून्हेगारी वृत्तीच्या लोकांकडुन घडल्या आहेत. यामध्ये विनाकारण जामखेड बदनाम होत आहे

 

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!