Homeव्हिडिओ बातम्याजामखेडच्या स्कायलाईन एन्टरप्रायजेसच्या कामाची राष्ट्रीय स्तरावर दखल; यूवा उद्योजक सौरभ शिंदेंचा दिल्ली...

जामखेडच्या स्कायलाईन एन्टरप्रायजेसच्या कामाची राष्ट्रीय स्तरावर दखल; यूवा उद्योजक सौरभ शिंदेंचा दिल्ली येथे सन्मान

*स्कायलाईन इंटरप्राइजेसच्या कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल

 

 

दिल्ली येथे पुरस्कार सोहळ्यात युवा उद्योजक सौरभ (विशाल) शिंदें ना ‘प्रशंसा प्रमाणपत्र’ प्रदान

जामखेड प्रतिनिधी

अफोर्डेबल हाऊसिंग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या स्कायलाइन एंटरप्रायझेसचे संचालक युवा उद्योजक सौरभ (विशाल) नामदेव शिंदे यांना ‘पीएमएवाय अफोर्डेबल हाऊसिंग अवॉर्ड्स २०२५’ अंतर्गत प्रशंसा प्रमाणपत्राने सन्मानित करण्यात आले.

 

सदर कार्यक्रम ५ जून २०२५ रोजी दिल्ली येथील हॉटेल इरॉस, नेहरू प्लेस येथे पार पडलेल्या विशेष कॉन्फरन्स आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री टोकन साहू, (माननीय राज्यमंत्री,गृह निर्माण आणि नगरविकास मंत्रालय,भारत सरकार) व श्री शंकर अग्रवाल, (माजी सचिव,गृह निर्माण आणि नगरविकास मंत्रालय, भारत सरकार) यांच्या उपस्थित जाहीर करण्यात आला.

 

सौरभ (विशाल) शिंदे यांचे कार्य अफोर्डेबल हाऊसिंगच्या माध्यमातून समाजातील सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे उपलब्ध करून देण्यावर केंद्रित आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली स्कायलाइन एंटरप्रायझेसने (सुखसागर नगर) जामखेड येथे दर्जेदार आणि परवडणाऱ्या घरांची निर्मिती केली आहे.

या सन्मानानंतर प्रतिक्रिया देताना सौरभ (विशाल) शिंदे म्हणाले, विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनखाली सामान्यांसाठी घर हे प्रत्येकाचे मूलभूत स्वप्न आहे आणि ते साकार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सौरभ (विशाल) शिंदें यांच्या या विशेष योगदानाबद्दल तसेच प्रशंसा प्रमाणपत्राने सन्मानित केल्याबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

या कार्यक्रमाला देशातील बांधकाम व्यवसायातील अनेक नामवंत उद्योजक, योजनांच्या प्रतिनिधी आणि केंद्र सरकारच्या संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!