पुण्यश्लोक एक्सप्रेस बस शुभारंभ संपन्न
पाठपुराव्याला यश :- पांडुरंग माने
जामखेड प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून राजमाता आहिल्यादेवी होळकर यांच्या सासर माहेर असलेल्या इंदोर – चौडी मार्गावर बस चालू करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे यूवा नेते पांडूरंग माने यांची मागणीला यश आले असून दि २९ मे रोजी चौडी येथे सकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत या बसचा शुभारंभ उत्साहात पार पडला. 
माझ्या सततच्या पाठपुराव्याला आज खर्या अर्थाने यश आले असून जामखेड-चौडी ते इंदोर ही बस गेल्या अनेक वर्षांपासून बंद होती मी एसटी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती दिनाच्या औचित्याने एसटी महामंडळाच्या वतीने जामखेड बस आगार अंतर्गत चौंडी ते इंदोर (पुण्यश्लोक एक्सप्रेस) प्रवाशी बस सेवेचा प्रारंभ आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवा नेते मा.पांडुरंग माने याच्या हस्ते श्रीफळ वाढून संपन्न झाला.
या ऐतिहासिक प्रसंगी आपण आवर्जून उपस्थित राहून बस सेवेच्या शुभारंभ कार्यक्रमाची शोभा वाढवली.
लोकप्रिय आमदार रोहित दादा पवार साहेब याच्या आशीर्वादाने हे शक्य झाले.
मनापासून आभार मानावेत तेव्हढे कमीच मा.माधव कुसेकर सर,मा.राजेंद्र जगताप साहेब सर्व पत्रकार मित्र बंधु आज सकाळी ठीक 06 वाजता गाडी जामखेड बस स्थानक येथून गाडी इंदोर साठी मार्गस्थ झाली.
या एस.टी.बस समारंभा वेळेस मा.पांडुरंग माने.सदस्य:- महाराजा यशवंतराव होळकर राज्यभिषेक सोहळा समिती महाराष्ट्र राज्य,चालक मा.दंहिफळे,नितीन काशिद, रोहित दादा पवार पी.ए.मा.निकाळजे,कुंडलिक राळेभात, मा.सचिन शिंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
