Homeव्हिडिओ बातम्याइम्रान कुरेशी मारहाण प्रकरणी ११ जणांविरोधात गून्हा दाखल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न...
इम्रान कुरेशी मारहाण प्रकरणी ११ जणांविरोधात गून्हा दाखल. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाल्याची नागरिकांमधुन भीतीदायक चर्चा
इम्रान कुरेशी मारहाण प्रकरणी ११ जणांविरोधात गून्हा दाखल
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची नागरिकांमधुन भीतीदायक चर्चा
जामखेड प्रतिनिधी
सात दिवसापुर्वी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी १०-१२ जणांच्या टोळक्याने लोखंडी गज, लाकडी काठी, हाँकी स्टीक, लोखंडी पाईपने अशा साहित्याने ज्या पध्दतीने मारहाण केली त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळत चाललेली दिसत आहे. पोलीसांचा धाक कमी झाला आहे अशी नागरिकांमध्ये चिंताजनक चर्चा आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी इम्रान रफिक कुरेशी हे दिनाक 28/04/2026 रोत्री 09/30 वा सुमारास गॅलक्सी कटींगचे दुकानाचे उद्घाटन कार्यक्रम संपवुन सुझुकी कंपनीच्या बर्गमँन मोटरसायकल वरून घरी जात असताना खर्डा चौकाच्या जवळ रोडवर गुलजार शेख, राहिल अस्लम तांबोळी, मजहर अलील शेख, सलमान तय्या सय्यद, शाहीर कुरेशी, हिदायत बब्बु, मज्जु खानसाहब पठाण, शाहीर बागवान, समीर फारूक कुरेशी,वसीम वाहीद कुरेशी, साजीद वाहीद कुरेशी असे हे ११ जण धावत माझ्या मोटारसायकलला आडवे आले मला जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करत गंभीर जखमी केले. 
त्यावेळी गुलजार शेख मला म्हणाला की आम्हाला वसीम भाई बिल्डर व साजीद भाई यांनी पाठविले आहे. तुम्ही त्यांना पाच लाख रूपये का दिले नाहीत.
तुम्ही भाईचे का ऐकले नाही आज तुमचा गेम वाजवुन टाकतो असे म्हणुन गुलजारने त्याचे हातातील लोखंडी गज माझे डोक्यात जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारत असताना मी माझा डावा हात डोक्यावर आडवा घेतला तसेच त्याचे सोबतचे इतर जणांनी त्यांचे जवळील हत्याराने माझे पायावर, हातावर, पाठीवर जिवे ठार मारण्याचे उद्देशाने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच माझे मोटारसायकल वर काठीने लोखंडी गजाने मारून गाडीने नुकसान केले तसेच सदर ठिकाणी लोक जमा होत असल्याचे पाहुन सर्वजण शिवीगाळ करत मोटारसायकल वर निघुन गेले मी जखमी अवस्थेत पडलेलो असताना तेथे माझे भाऊ इरफान रफीक कुरेशी व इफ्तेकर रफीक कुरेशी असे खर्डा चौकातुन माझे जवळ आले व त्यांनी मला अँम्बुलन्समधुन समर्थ हॉस्पीटल जामखेड येथे प्राथमिक उपचार करून श्रीदिप हाँस्पीटल अहिल्यानगर येथे औषध उपचारासाठी दाखल केले.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जामखेड मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या पद्धतीने मारहाण झाली त्यावरून भीतीदायक चर्चा नागरिकांमधुन होत आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोई किशोर गावडे करत
प्रतिनिधी मरहाण यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!