लहान मुलीसह विवाहितेची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
मुल होत नसल्याने छळ ; पतीविरुद्ध गुन्हा दाखल
जामखेड प्रतिनिधी
अनेक वर्षांपासून होत असलेल्या कौटुंबिक छळाला कंटाळून लहान मुलीसह विवाहितेने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची दूखद घटना घडली आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी
मृत महिलेचे पती जामखेड येथील लक्ष्मण अश्रुबा कुमटकर (सध्या रा. राजगुरुनगर, मूळ गाव. जामखेड) यांच्याविरुद्ध खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयत संजीवनी लक्ष्मण कुमटकर (वय ३५,) यांचे वडील अशोक अंबादास भोसले (रा. खांडवी, जि. अहिल्यानगर) यांनी खेड पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांची मुलगी संजीवनीला तिचा पती लक्ष्मण कुमटकर याच्याकडून गेल्या अनेक वर्षांपासून मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत होता.
मुलगा होत नसल्याच्या कारणावरून तिला वारंवार शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करण्यात येत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पतीच्या सततच्या त्रासाला कंटाळून संजीवनी यांनी गुरुवारी (दि. ३० एप्रिल) रात्री साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास राक्षेवाडी येथील विहिरीत लहान मुलीसह उडी घेत आपले आणि मुलीचे जीवन संपवले आहे.

