Homeव्हिडिओ बातम्याहवामान खात्याचा अंदाज व प्रशासनाचा यलो अलर्ट' , गेला कोरडाच परतीच्या पाऊसाकडुन...
हवामान खात्याचा अंदाज व प्रशासनाचा यलो अलर्ट’ , गेला कोरडाच परतीच्या पाऊसाकडुन निराशा ; दुष्काळाच्या उपाययोजना करण्याची गरज जलसाठे कोरडेच ,खरीप हंगाम वाया , रब्बीचीही चिंता माणसाची नियत बदलली ; निसर्ग बदलला !
हवामान खात्याचा अंदाज व प्रशासनाचा यलो अलर्ट’ , गेला कोरडाच
परतीच्या पाऊसाकडुन निराशा ; दुष्काळाच्या उपाययोजना करण्याची गरज
जलसाठे कोरडेच ,खरीप हंगाम वाया , रब्बीचीही चिंता
माणसाची नियत बदलली ; निसर्ग बदलला !
जामखेड प्रतिनिधी
गेल्या काही
दिवसांपासून कुठे ढगाळ वातावरण तर कुठे कडक ऊन पडुन आता पाऊस पडेल असे रोजच वातावरण झाले होते. भारतीय हवामान विभागाने १२, १३ व १४ सप्टेंबर असे तीन दिवस वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला होता. मात्र, हवामान विभागाचा अंदाजही कोरडाच निघाला असून जामखेड तालुक्यात नोंद घ्यावी असा पाऊस कुठेच पडला नाही . पावसाच्या पुनरागमनाने आशा निर्माण झालेला शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.
ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाची शेतकऱ्यांसह नागरिकांना अपेक्षा होती. हवामान विभागाने पावसाला यलो अलर्ट दिला होता. ढगाळ वातावरण तयार झाले होते परंतु काही ठिकाणीच रिमझिमच पाऊस झाला . हवामान विभागाने वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘यलो अलर्ट’ दिला होता, परंतु रिमझिम पाऊसच पडला. हवामान विभागाकडून पावसाचे सतत वेगवेगळे इशारे व अंदाज दिले जात असले, तरी पाऊस गायबच असल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी, उद्योगपती, व्यावसायिकही चिंतेत आहेत.
खरीप हंगाम धोक्यात आला आहे.
ऐन पिकं वाढीच्या काळात पाणी मिळत नसल्याने सोयाबीनसह अन्य पिके वाळली आहेत. यामुळे यंदाचा खरीप हंगाम जवळपास वाया गेल्यात जमा आहे . तालुक्यातील लहान मोठे जलसाठे अजूनही कोरडेच आहेत परतीच्या पाऊसाकडुन मोठी निराशा होतांना दिसत आहे त्यामुळे येणारे रब्बी हंगामाबाबतही चिंता वाटत आहे . पिकांच्या नुकसानीसोबतच आगामी काळात पिण्याच्या पाण्याच्या भीषण संकटाचा सामना करावा लागण्याची दाट शक्यता आहे .दुष्काळ सदृश्य परस्थिती निर्माण झाली असून सरकारकडून दुष्काळ जाहीर होऊन दुष्काळी उपाययोजना लवकरात लवकर सुरू करण्याची गरज असल्याचे जनतेच्या चर्चेतून ऐकायला मिळत आहे .
———–
कारण भारतीय हवामान विभाग (IMD) आणि स्थानिक हवामान तज्ज्ञांच्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

—————————–
माणसांची नियत ;बदलली निसर्ग बदलला
————-
माणसांची नियत बदलली, निसर्ग बदलला” हे विधान आजच्या काळातील एका अत्यंत कडू आणि जळजळीत सत्यावर बोट ठेवते. माणूस आणि निसर्ग यांचे नाते अनादी काळापासून आहे. पण जसजसा माणूस आधुनिकतेकडे आणि स्वार्थाकडे झुकू लागला, तसतशी त्याची निसर्गाप्रती असलेली ‘नियत’ (भावना/दृष्टिकोन) बदलली, आणि याचा थेट परिणाम म्हणून आज संपूर्ण निसर्ग आणि पर्यावरणाचे चक्र बदलून गेले आहे.
माणसाने अमाप वृक्षतोड केली.सिमेंटची जंगले उभी केली.अमाप प्लास्टीक कचरा निर्माण केला.माणसाला स्वार्थापुढे नाते कळेना.मणुष्य जीवन कशासाठी आहे हेच कळेना.
निसर्ग कधीच कोणाचा सूड घेत नाही, तो फक्त स्वतःचे नियम पाळतो. माणसाने माणुस होण्याचे नियम तोडले .परिणामी कुठे अवकाळी पाऊस ,कुठे दूष्काळ कुठे महापुर याचा परिणाम एकुणच माणसाच्या जीवनावर झालाच आहे पण त्याची झळ मुक्या प्राण्यांनाही सोसावी लागत आहे .
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!