Homeव्हिडिओ बातम्याशासकीय नियमानुसार अतिक्रमणावर कारवाई ; सार्वजनिक रस्ते व शासकीय जागा मोकळ्या करणार...

शासकीय नियमानुसार अतिक्रमणावर कारवाई ; सार्वजनिक रस्ते व शासकीय जागा मोकळ्या करणार – : सभापती प्रा राम शिंदे, प्रा राम शिंदे यांची साखळी उपोषणला भेट व आधिकारयांशी चर्चा करत सुचना

शासकीय नियमानुसार अतिक्रमणावर कारवाई ;
सार्वजनिक रस्ते शासकीय जागा मोकळ्या करणार – : सभापती प्रा राम शिंदे

प्रा राम शिंदे यांची साखळी उपोषणला भेट व आधिकारयांशी चर्चा करत सुचना

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील महामार्गालगत अतिक्रमण हे शासकीय नियमानुसार काढण्यात येणार आहे. यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही.

यामध्ये सार्वजनिक रस्ते शासकिय जागा मोकळ्या केल्या जातील असे सभापती प्रा राम शिंदे यांनी अवधूत पवार यांच्या साखळी उपोषणस्थळी भेट घेऊन सांगितले. सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांच्या साखळी उपोषण स्थळी त्यांनी भेट देऊन अवधूत पवार यांची विचारपूस करत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना अतिक्रमण विषयावर तातडीने नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.अतिक्रमणाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून शहराच्या विकासात अडथळा ठरत आहेत. सार्वजनिक रस्ते व शासकीय जागा मोकळ्या करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.

या प्रसंगी प्रांताधिकारी नितीन पाटील, जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी शुभम जाधव, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या सह यावेळी बाजार समिती सभापती पै. शरद कार्ले, माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर, माजी नगरसेवक अमित चिंतामणी, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. कैलास माने, मनसे नेते प्रदीप टापरे, भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद, ग्रामीण मंडल अध्यक्ष बापुराव ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगेश आजबे, काँग्रेसचे राहुल उगले, शहाजीराजे भोसले, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, प्रवीण चोरडिया, मनोज कुलकर्णी, नगरसेवक प्रा विकी घायतडक, पवन राळेभात, श्रीराम डोके, प्रा. लक्ष्मण ढेपे, ॲड . प्रविण सानप, अशोक शेळके, गोरख घनवट, हवाशेठ सरनोबत, सनी सदाफुले, विनायक राऊत, रंगनाथ राळेभात, सरपंच, महारूद्र महारनवर, विजय पवार, प्रविण होळकर, अर्जुन म्हेत्रे, डॉ. विठ्ठल राळेभात, डॉ. अल्ताब शेख, ऋषिकेश मोरे,यांच्या सह पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.


ग्रामस्थसाखळी उपोषणाच्या पाचव्या दिवशी सभापती प्रा राम शिंदे यांनी भेट देत अतिक्रमणा संदर्भात सविस्तर चर्चा करून अतिक्रमण हटवण्यासाठी आज राष्ट्रीय महामार्ग अभियंता तसेच नगरपरिषद व सर्व अधिकारी यांना सूचना देत नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले.

तसेच प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर आम्ही उपस्थित राहून नियमाचे काटेकोर पालन करू, येत्या चार व पाच तारखेला अतिक्रमणा संदर्भात काय निर्णय होतो याकडे जामखेड करांचे लक्ष लागले असून अवधूत पवार यांचे
साखळी उपोषण तोपर्यंत चालुच राहील.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!