आईवडिलांचे फेडले पांग
जवळ्याचा तरूण अक्षय लेकुरवाळे बनला सीए
परिश्रमाचा प्रेरणादायी प्रवास
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून अक्षय लेकुरवाळे यांची यशस्वी झेप; जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमांचा प्रेरणादायी प्रवास


त्यानंतर त्यांनी रयत शिक्षण संस्थाच्या छत्रपती शिवाजी विद्यालयात माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दहावीपर्यंतचे शिक्षण सातारा येथील महाराज सयाजीराव विद्यालयात घेतल्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी अहिल्यानगर येथील रेसिडेन्शिअल महाविद्यालयात प्रवेश घेतला.बारावीनंतरच सीए होण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले होते.
या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी पुण्यात जाऊन कठोर परिश्रमांची पराकाष्ठा केली. अभ्यासादरम्यान त्यांनी सी. व्ही. चितळे यांच्याकडे तीन वर्षांची आर्टिकलशिप (इंटर्नशिप) पूर्ण केली. सीए ही परीक्षा अत्यंत कठीण मानली जाते; अनेकदा अपयशाचा सामना करावा लागतो.अक्षय यांच्या वाट्यालाही अनेक अपयश आले, परंतु त्यांनी खचून न जाता अधिक जिद्दीने अभ्यास सुरू ठेवला आणि अखेर यशाचे शिखर गाठले.

त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. शेतकऱ्याच्या मुलाने जिद्द, चिकाटी आणि कष्टांच्या बळावर गाठलेले हे यश निश्चितच ग्रामीण भागातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.