ज्यांची जन्मदात्या आईवडीलांना भीती वाटते त्यांच्या जीवनाचे काय सार्थक??
शेवट गुंडगिरीतच
शेवट गुंडगिरीतच
दि ४ मार्च रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर गेल्या १३ दिवसांपासून सागर मोहळकरची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि अखेर सोम दि १६ रोजी सायंकाळी उपचारादरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ८ च्या सुमारास जामखेड शहरातील नुराणी कॉलनी परिसरात सागर मोहळकरवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला होता.
या हल्ल्यात त्याच्या शरीरात पाच गोळ्या घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्यावर जामखेड व अहिल्यानगर येथे उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले होते.
यासाठी पुण्याच्या कोथरूड गुंडांची मदत घेण्यात आली होती. पोलिसांनी आतापर्यंत जामखेड येथील अभिमन्यू पोते आणि पुण्यातील रोहित विठ्ठल आखाडे याला अटक केली आहे.
ज्या जन्म दात्यांना स्वतःच्या मुलासमोर येण्याची भीती वाटु लागली त्या मुलाचे जन्माचे काय सार्थक? पै. सागर मोहळकरचा मृत्यू ज्या पध्दतीने झाला ती पध्दत नवीन नाही पण समाजाबरोबरच जन्मदात्या आईवडिलांनाही समोर यायला भीती वाटत होती.
गोळीबार घटनेच्या काही दिवस आगोरदच सागर मोहळकरच्या त्रासाबद्दल खुद बापाने पोलिसांकडे तक्रार दिली होती.या वरून त्याच्याकडून आईवडीलांनाही वाटत सुरक्षित वाटत नव्हते असे दिसते. जेथे जन्मदात्या आईवडीलांना आपल्या मुलाची भीती वाटावी हे जीवनाचे मोठे दुर्भाग्य आहे.