Homeव्हिडिओ बातम्याज्यांची जन्मदात्या आईवडीलांना भीती वाटते त्यांच्या जीवनाचे काय सार्थक?? शेवट गुंडगिरीतच, पै...

ज्यांची जन्मदात्या आईवडीलांना भीती वाटते त्यांच्या जीवनाचे काय सार्थक?? शेवट गुंडगिरीतच, पै सागर मोहळकरची मृत्यूशी झुंज अपयशी

ज्यांची जन्मदात्या आईवडीलांना भीती वाटते त्यांच्या जीवनाचे काय सार्थक??

शेवट गुंडगिरीतच

सागर मोहळकरची १३ दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी

​जामखेड प्रतिनिधी

गोळीबारात जखमी झालेल्या पैलवान सागर मोहळकर या कुख्यात गुंडाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .

दि ४ मार्च रोजी झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर गेल्या १३ दिवसांपासून सागर मोहळकरची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि अखेर सोम दि १६ रोजी सायंकाळी उपचारादरम्यान पुण्यातील ससून रुग्णालयात मृत्यू झाला. ४ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७ ते ८ च्या सुमारास जामखेड शहरातील नुराणी कॉलनी परिसरात सागर मोहळकरवर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला होता.

या हल्ल्यात त्याच्या शरीरात पाच गोळ्या घुसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याच्यावर जामखेड व अहिल्यानगर येथे उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले होते.
​या प्रकरणाचा तपास करतांना स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपासाच्या आधारे मुख्य आरोपी अभिमन्यू महादेव पोते (रा. जामखेड) याला झिक्री परिसरातून अटक केली होती. त्याच्या चौकशीतून जुन्या वादातूनच सागरवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता.

यासाठी पुण्याच्या कोथरूड गुंडांची मदत घेण्यात आली होती. पोलिसांनी आतापर्यंत जामखेड येथील अभिमन्यू पोते आणि पुण्यातील रोहित विठ्ठल आखाडे याला अटक केली आहे.
तर चार्ली ऊर्फ माऊली साठे आणि चिन्या या गुंडांचा शोध अद्याप सुरू आहे.
आता सागरचा मृत्यू झाल्यामुळे या गुन्ह्यात ‘खुनाचे कलम’ वाढणार आहे.

———————–

सागर मोहळकरच्या मृत्यूच्या घटनेने जामखेड तालुक्यात कोणाला तो जगायला हवा होता असे वाटले तर बहूतांश लोकांना एक गुंड कमी झाला असे वाटले. मात्र त्याच्या आईवडिलांना काय वाटले हे कोणी नाही पाहिले.
मुलाच्या भवितव्यासाठी आई वडीलांनी कष्ट उपसले. स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन मुलाला शिकवले. प्रेमापोटी हव ते स्वातंत्र्य दिले. मुलाने पैलवानकीत नाव कमावले. आईवडिल मुलाच्या यशाचा आनंद घेण्याआधीच मुलगा अनपेक्षितरीत्या गुंडगिरीत वळला. साथ संगतीतुन व्यसन वाढले, व्यसनातून गुन्हेगारी कृत्य वाढले, त्यातुन अनेक शत्रु मोफत वाढले. आईवडीलाची इज्जत अप्रत्यक्ष कमी झाली. मुलाच्या गुन्हेगारी कृत्याची दहशत जसजसी समाजात वाढत गेली तसतसे आईवडील खसत गेले.

ज्या जन्म दात्यांना स्वतःच्या मुलासमोर येण्याची भीती वाटु लागली त्या मुलाचे जन्माचे काय सार्थक? पै. सागर मोहळकरचा मृत्यू ज्या पध्दतीने झाला ती पध्दत नवीन नाही पण समाजाबरोबरच जन्मदात्या आईवडिलांनाही समोर यायला भीती वाटत होती.

गोळीबार घटनेच्या काही दिवस आगोरदच सागर मोहळकरच्या त्रासाबद्दल खुद बापाने पोलिसांकडे तक्रार दिली होती.या वरून त्याच्याकडून आईवडीलांनाही वाटत सुरक्षित वाटत नव्हते असे दिसते. जेथे जन्मदात्या आईवडीलांना आपल्या मुलाची भीती वाटावी हे जीवनाचे मोठे दुर्भाग्य आहे.
या गोष्टीतुन त्याचे सहकारी मित्र व इतर आजची तरूण पिढी बोध घेतील का? आईवडीलांबरोबर कसं वागावं. जन्मदात्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटावा की अपमान याचा बोध घेतील का??
आज साथ संगतीतुन व्यसनमार्गाला लागलेल्या, चुकीच्या गोष्टी करणारयासाठी बिनदिक्कत धजवणारया, आईवडीलांची, कुटुंबाची काळजी नसणाऱ्या, राजकारणातील चुकीच्या गोष्टींनी प्रभावित होणाऱ्या तरूण मुलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही बाब चिंताजनक आहे.

पत्रकार यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!