काही वर्षातच सभामंडप कोसळला:
आनंदासाठी ग्रामपंचायतने केलेल्या सर्व कामांची चौकशी करा – स्वप्नील खाडे
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील मौजे आनंदवाडी ग्रामपंचायतने १० वर्षापुर्वी बांधलेला सभामंडप दि ३० जुलै २०२५ रोजी भर दुपारी कोसळला व भुईसपाट झाला. जर काही वर्षातच केलेले काम कोसळते यावरुन या सभामंडपाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे.
अशाच प्रकारे ग्रामपंचायतने केलेले सर्व विकास कामे निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. सर्व कामांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खाडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तहसील कार्यालयाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कोसळलेल्या सभामंडपात गावातील नागरीक व लहान मुले-मुली खेळत असतात. सुदैवाने कोणतीही जिवित हानी झालेली नाही.तसेच ग्रामपंचायतीने केलेले विकास कामे त्यातील अंगणवाडी शाळा ही अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शाळा देखिल या सभामंडपासारखी कोसळून लहान मुलांचा जीव धोक्यात येऊन मोठी हानी होन्याची शक्यता आहे.
तसेच ग्रामपंचायतने अशा ठिकाणी स्मशानभूमी केलेली आहे की, माणसाचा मृत्यू झाल्यानंतर त्यास अग्नी देण्यासाठी तिथपर्यंत घेऊन जाण्यासाठी रस्ता नाही व तेही काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे.तसेच जलजिवन पाणी योजनेचा आलेला संपुर्ण निधीखर्च होऊन नागरीकांच्या कोणाच्याही घरापर्यंत पाणी आलेले नाही. त्यामुळे जलजिवन अंतर्गत आलेल्या निधीचा व सर्व कामांची चौकशी करण्यात यावी.
व तसेच ग्रामपंचायतने केलेलं कामे माहितीच्या अधिकाराने जर पाहिले तर काही कामे केवळ कागदोपत्री झालेले आहे. व या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात पैशाचा भ्रष्टाचार झालेला आहे. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांविरुध्द योग्य ती कायदेशिर कारवाई करावी. विनंती.
आनंदवाडी ग्रामपंचायत यांनी आत्तापर्यंत केलेल्या सर्व कामाची आपण सखोल चौकशी करुन कारवाई करावी व भष्ट्राचार थांबवावा अशी मागणी केली आहे. 
सदरील कामांची चौकशी वेळेवर न झालयास व योग्य उत्तर न मिळाल्यास संपुर्ण आनंदवाडी येथील ग्रामस्थांसह तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा स्वप्नील खाडे यांनी दिला आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
