Homeव्हिडिओ बातम्या... तर मग विकास कुठे आहे? :- करूणा मुंडे :घराणेशाहीदेशावर संकट :एकतर्फी...

… तर मग विकास कुठे आहे? :- करूणा मुंडे :घराणेशाहीदेशावर संकट :एकतर्फी विकास:

…. तर मग विकास कूठे आहे? :- करूणा मुंडे

घराणेशाही देशावर संकट: एकतर्फी विकास

 

स्वराज्य शक्ती सेना देणार येत्या निवडणुकांत नवे चेहरे

 

 

जामखेड प्रतिनिधी

राज्यात युवक, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. ७० वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेची शाळा जशी होती, तशीच आजही मग विकास कुठे आहे? फक्त आमदार, खासदार यांच्यासारख्या घराणेशाही लोकांचाच विकास झाला आहे. त्यांचे दहा-दहा कारखाने, मोठमोठ्या शिक्षणसंस्था झाल्या. रुग्णालये असून, गोरगरिबांसाठी सुविधा नाहीत. शेतकऱ्यांना पीकविमा मिळत नाही. महिलांना रोजगार नाही. राजकारणी लोक जातीपातीचे राजकारण करून स्वतःची पोळी भाजून घेत आहेत.

गेल्या ७० वर्षांपासून राज्यात घराणेशाही चालू असल्याने लोकशाही संपून केवळ आमदार, खासदार यांचाच विकास झाला. स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म तयार केला आहे. येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना त्याद्वारे संधी देणार असल्याचे स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी जामखेड तालुक्यातील नान्नज येथे आयोजित सभेत सांगितले. यावेळी स्वराज्य शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष समीर शेख, उपाध्यक्ष महेश भवाळ, जिल्हा सचिव अक्षय बोराडे, बीड जिल्हाध्यक्ष नवनाथ हरे, अहिल्यानगर महिला जिल्हाध्यक्ष संगीता काळे, सत्यशोधकचे महादेव डाडर, सरपंचपुत्र महेंद्र मोहळकर, पै. बाबा शेख, ग्रामपंचायत सदस्य लियाकत शेख, सचिन मलंगनेर, महिला तालुकाध्यक्ष सारिका बडेकर, अंगद फंदाडे, विजू साठे, भारत क्षीरसागर, लखन भवाळ, असलम शेख, खलील शेख, भिवा साठे यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

मत विकू नका, नव्यांना साथ द्या

स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून बीज पेरले आहे. देशात एकमेव नितीन गडकरी यांनी रस्त्यांचे मोठे काम केले आहे. बाकी अनेक राजकारण्यांनी खालची पातळी गाठली आहे. यात बदल होण्यासाठी महस आगामी निवडणुकांत नव्या चेहऱ्यांना आम्ही संधी देणार आहोत. त्यांना सहकार्य करा. मत विकू नका, नवीन लोकांना साथ द्या, असे भावनिक आवाहन करुणा मुंडे यांनी केले.

 

सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले, तर लखन भवाळ यांनी आभार मानले. पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संजय लोखंडे, पोकॉ गणेश ढोबळे यांनी बंदोबस्त ठेवला होता.प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!