Homeव्हिडिओ बातम्याअपघातग्रस्तांना मदत केल्यास कायदेशीर कटकटीतून सुटका, मदत करणारांना मिळणार २५ हजार रुपये...

अपघातग्रस्तांना मदत केल्यास कायदेशीर कटकटीतून सुटका, मदत करणारांना मिळणार २५ हजार रुपये बक्षीस – केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी

अपघातग्रस्तांना मदत केल्यास कायदेशीर कटकटीतून सुटका !
————————-
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५ हजार रुपये मिळणार-केंद्रित मंत्री नीतीन गडकरी 

जामखेड प्रतिनिधी

रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने ‘गुड समॅरिटन (मदतनीस) योजनेत मोठी सुधारणा केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले, की अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोच विणाऱ्या व्यक्तीला आता २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे. यापूर्वी ही रक्कम केवळ ५ हजार रुपये होती, ज्यामध्ये आता पाच पटीने वाढ करण्यात आली आहे.
तरी  सर्व सामान्य जनतेने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून डोळ्यांदेखत झालेल्या अपघातानंतर जखमी व्यक्तीला गोल्डन अवर मध्ये जवळच्या रुग्णालयात दाखल करुन रोख रुपये २५ हजाराचे बक्षीस मिळवावे असे आवाहन समाजसेवक जे.डी.शाह यांनी ऐका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
पत्रात पुढे म्हटले आहे की जखमींना ‘गोल्डन अवर’मध्ये रुग्णालयात. दाखल करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून २५ हजार रुपये आणि प्रशस्तिपत्र दिले जाईल.
तसेच अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पहिल्या ७ दिवसांसाठी १.५ लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस (मोफत) उपचार सरकार करणार आहे. अपघातग्रस्त मदत करणाऱ्या व्यक्तीला ‘राहा-वीर’ या पदवीने सन्मानित केले जाईल. ही योजना केवळ राष्ट्रीय महामार्गा पुरती मर्यादित नसून राज्य महामार्ग, जिल्हा आणि ग्रामीण रस्त्यांवरील अपघातांसाठीही लागू करण्यात आली आहे.
यासंदर्भात केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत ही माहिती दिली.
तसेच केंद्र सरकार अशा मॉडेलवर काम करत आहे की जिथे अपघातस्थळी अवघ्या १० मिनिटांत आधुनिक सुविधांनी रुग्णवाहिका पोहोचेल. यासाठी राज्यांशी करार केले जात असुन तांत्रिकदृष्ट्या प्रगत हेल्पलाइन सिस्टीम उभारली जात आहे.
पत्रात शेवटी म्ह्टले की मदतकार्य करतांना कायदेशीर कटकटीची भिती रहात होती यामुळे
अनेकदा पोलीस चौकशी किंवा न्यायालयाच्या फेऱ्यांच्या भीतीने लोक जखमींना मदत करण्यास टाळतात. मात्र, ‘गुड सर्मेरिटन’ कायद्यानुसार मदत करणाऱ्या व्यक्तीची कोणतीही सक्तीने चौकशी केली जाणार नाही किंवा त्यांना साक्षीसाठी अडकवले जाणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तरी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्य महामार्ग व ग्रामीण भागातील रस्ते यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.

तरी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून अनपेक्षित अपघातग्रस्त रुग्णांना गोल्डन अवर मध्ये तातडीने मदत करुन पुण्या बरोबर अतिशय महत्त्वाचे शासकीय निमशासकीय व सामाजिक कार्यासाठी उपयुक्त येणार प्रशस्तिपत्र व रुपये २५ हजाराचे बक्षीस घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!