Homeव्हिडिओ बातम्यानगराध्यक्षपद म्हणजे माझ्यासाठी जनतेचा विश्वास आहे,तो सार्थ करीन! - नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी....

नगराध्यक्षपद म्हणजे माझ्यासाठी जनतेचा विश्वास आहे,तो सार्थ करीन! – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी. आक्रोश करणारांच्या खात्यात पैसे आलेत – प्रा राम शिंदे

नगराध्यक्षपद म्हणजे माझ्यासाठी जनतेचा विश्वास आहे, तो सार्थ करीन! – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी

नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य सत्कार

जामखेड प्रतिनिधी
नगराध्यक्ष हे पद मिरवण्यासाठी नसून तो जनतेचा विश्वास आहे. राजकारण हे जनतेच्या सेवेसाठी असते हे सभापती प्रा राम शिंदे यांनी दाखवुन दिले आहे. जामखेडच्या जनतेने नगराध्यक्ष पद देऊन ठेवलेला विश्वासाला तडा जाऊ देणार नाही सभापती प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्थ ठरवु अशी ग्वाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी यांनी सत्काराला उत्तर देताना दिली. जामखेड नगरपरिषद निवडणुकीत भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल भाजपाच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी व निवडुन आलेल्या १५ नगरसेवकांचा भव्य सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

सभापती प्रा राम शिंदे यांच्या हस्ते झालेल्या सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा मधुकर राळेभात होते तर प्रमुख उपस्थितीत भाजपचे तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, सभापती शरद कारले, अजय काशिद, प्रविण घुले, विजय चौधरी, शेखर खरमाळे, अशोक खेडकर,गणेश क्षिरसागर, डॉ. भगवान मुरूमकर, रवी सुरवसे, वैजनाथ पाटील,० सोमनाथ पाचारणे, विष्णू भोंडवे, प्रविण चोरडिया, ज्ञानेश्वर झेंडे, प्रशांत शिंदे, चंद्रकांत राळेभात, अर्जुन म्हेत्रे, सचिन घुमरे, राहुल बेदमुथ्था, केदार रसाळ, प्रविण होळकर, मनोज कुलकर्णी, उद्धव हुलगुंडे, तुषार बोथरा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या की एक विलक्षण योगायोग म्हणजे, १९७४ मध्ये माझ्या सासूबाई ग्रामपंचायत सदस्या असताना त्यांच्या काळात भुतवडा तलावातून जामखेडकरांना पाणी मिळाले होते, जे आजपर्यंत सुरू आहे. आता माझ्या कार्यकाळात शहराला उजणी धरणातून पाणी मिळणार आहे, असेही प्रांजल चिंतामणी यांनी सांगितले.

*आक्रोश मोर्चा काढणारांच्या खात्यात पैसे आलेत- प्रा राम शिंदे*
——-
यावेळी बोलताना सभापती प्रा राम. शिंदे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. जामखेडची बारामती करू म्हणणारांनी ‘भानामती’ केली हे आता जामखेडकरांच्या चांगलेच लक्षात आले आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीतील पराभवाची परतफेड जामखेडकरांनी नगरपरिषद निवडणुकीच्या निकालातून केली आहे. आता आपण खऱ्या अर्थाने जामखेडचा चेहरामोहरा बदलू, असा विश्वास विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केला.आपल्या काही उमेदवारांचा पराभव झाला असला तरी त्यांना सोबत घेऊन विकासाची दिशा ठरवली जाईल. आक्रोश मोर्चा काढणाऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले आहेत. त्यांना काय करावं काय नाही ताळमेळ नाही. आपले उमेदवार सुशिक्षित असून ते जनतेच्या अडीअडचणी सोडवतील, असेही ते म्हणाले. प्रास्ताविक करताना अमित चिंतामणी यांनी विधानसभेचे अपयश पुसून सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी पंधरा मताधिक्याने निवडून आलेले नगरसेवक सुमन शेळके, श्रीराम डोके, अॅड. प्रविण सानप, पोपट राळेभात, सिमा रवींद्र कुलकर्णी, विकी घायतडक, प्रांजल अमित चिंतामणी, हर्षद काळे, नंदा प्रविण होळकर, मोहन पवार, वैशाली अर्जुन म्हेत्रे, तात्याराम पोकळे, संजय काशिद, आशाबाई टकले, जया संतोष गव्हाळे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पराभूत उमेदवारांचाही सन्मान करण्यात आला आला.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!