Homeव्हिडिओ बातम्याशहरातल्या महामार्गाचे काम लवकर पुर्ण करा - नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, जिल्हाधिकारयांकडे शहरात...
शहरातल्या महामार्गाचे काम लवकर पुर्ण करा – नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, जिल्हाधिकारयांकडे शहरात थांबलेल्या रस्त्याचे काम लवकर पुर्ण करण्याची मागणी, कामाला अडथळा आणु नका
शहरातल्या महामार्गाचे काम लवकर पुर्ण करा -: नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी
जिल्हाधिकारयांकडे
शहरात थांबलेल्या महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी
अडथळा कोणीही आणु नका

जामखेड प्रतिनिधी
नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी नागरिकांना अपुर्ण रस्त्याचा होणारा त्रास दूर करण्यासाठी पाऊल उचलत आपल्या कामाला सुरूवात केली आहे.
जामखेड नगरपरिषद नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांनी शहरातील विविध समस्या सोडवत शहरविकासाठी दिलेला शब्द पाळण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल उचललेले आहे. नागरिकांना व वाहनांना त्रासदायक होत असलेल्या शहरात थांबलेल्या महामार्गाचे काम लवकर पुर्ण करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांना निवेदन दिले आहे.
जिल्हाधिकारी यांना दि २९ डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राष्ट्रीय महामार्ग ५४१ ड जामखेड सौताडा हा जामखेड शहरातून जात आहे. तसेच सदर रस्त्याचे काम अत्यंत दिरंगाईने चालु आहे. आपण या बाबत १० दिवसांपूर्वीच जामखेड तहसिल कार्यालयात संबंधीत कार्यालयाचे अधिकारी, ठेकेदार यांना बोलवत कामा बाबत आढावा घेत तात्काळ रस्त्याचे काम करण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.
जर रस्ता कामात कोणी अडथळा निर्माण करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सुचना देखील दिल्या होत्या मात्र अद्यापपर्यत संबंधीत ठेकेदाराकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली दिसत नाही. यामुळे जामखेड शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. तसेच नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
जामखेडच्या नागरिकांना व शहरातुन जाणार्या येणारया सर्व वाहनांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तरी शासनाच्या आदेशानुसार संबंधीत ठेकेदाराकडून राष्ट्रीय महामार्ग ५४१ ड जामखेड – सौताडा या रस्त्याचे काम लवकर सुरळीत पणे चालु करून पुर्ण करण्यात यावे.
नागरिकांना व वाहनधारकांना अपुर्ण रस्त्यापासून होणारा त्रासातुन मुक्त करावे. असे नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी अमित चिंतामणी यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रतिनिधी यासीन शेख 9423391215
error: Content is protected !!