Homeव्हिडिओ बातम्याशिवछत्रपतींनी महाराष्ट्रात लोकशाहीचा पाया रोवला - पोलीस निरीक्षक महेश पाटील ...

शिवछत्रपतींनी महाराष्ट्रात लोकशाहीचा पाया रोवला – पोलीस निरीक्षक महेश पाटील प्रा.मधुकर राळेभात मित्र परिवाराच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

शिवछत्रपतींनी महाराष्ट्रात लोकशाहीचा पाया रोवला – पोलीस निरीक्षक महेश पाटील

 

प्रा.मधुकर राळेभात मित्र परिवाराच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी

जामखेड प्रतिनिधी

 

अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन स्वराज्याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांनी आस्तित्वात आणली.याच संकल्पनेतुन महाराष्ट्र उभा राहिला.अष्टप्रधान मंडळ स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात लोकशाहीचा पाया रोवला होता. कर्तृत्वातुन राजांची कीर्ती पूर्ण भारतभर पसरलीअसे प्रतिपादन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले.

सालाबादप्रमाणे यंदाही जामखेड शहरातील आर.एन.ज्वेलर्स शेजारी शिवजयंती उत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ वी जयंती निमित्त अभिवादन सभेचे आयोजन प्रा.मधुकर राळेभात मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी पोलीस निरीक्षक महेश पाटील बोलत होते. यावेळी हभप ज्ञानेश्वरी नागरगोजे,प्राचार्य विकी घायतडक,ॲड डॉ अरुण जाधव, अझहर भाई काझी, गोकुळ गायकवाड, ॲड शमा हाझी कादर, संजय काशिद,पै.शरद कारले ,प्रा.जाकीर शेख आदींनी शिवजयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक महेश पाटील हे होते तर जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात,बाजार समितीचे सभापती पै.शरद कारले ,मुस्लिम पंच कमिटीचे अझहर भाई काझी, वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते ॲड. डॉ अरुण जाधव, पलटननायक अकबर शेख,मजूर फेडरेशनचे संचालक प्रकाश सदाफुले,इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य विकी घायतडक, संजय काशिद,कॅ लक्ष्मण भोरे, श्रीधर जगदाळे,बाजार समितीचे संचालक विठ्ठल चव्हाण,शिवाजीराव ढाळे,भाजपा शहराध्यक्ष पवन राळेभात,बापूसाहेब ओव्हळ,नगरसेवक दिगंबर चव्हाण, मोहन पवार, अमित जाधव,ॲड .शमा हाजी कादर, महारुद्र नागरगोजे, हर्षल डोके,नय्युमभाई सुभेदार, उद्योजक गोरख घनवट,विजय कोठारी,

गुलाब जांभळे, उमेश माळवदकर,पिंटूशेठ बोरा,जाकीर शेख,केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य सरचिटणीस राम निकम,अशोक गायकवाड,विनोद बहीर ,इस्माईल सय्यद, मुख्तार सय्यद, जमीर सय्यद, दिपक खेडकर, प्रविण बोलभट, आण्णा ढवळे, अर्जुन लोंढे, प्रा.प्रदीप भोंडवे,हरिभाऊ आजबे, डॉ चंद्रशेखर नरसाळे, सरफराज पठाण,गोकुळ गायकवाड, नामदेव राळेभात,सुधीर पवार, कबीर घायतडक,गणेश हगवणे आदी शिवप्रेमी,शिक्षक,व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राम निकम यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा.मधुकर राळेभात यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भरत राळेभात,सुरज राळेभात, नागार्जुन राळेभात,लखन राळेभात, बाळासाहेब मोहिते आदींनी परिश्रम घेतले.

प्रतिनिधी यासीन शेख 9423391215 

बातमी शेअर करा...
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!