सोशलमीडियाच्या युगातही पुस्तक वाचणे महत्वाचे – : रमेशभाऊ गुगळे
लोकमान्य वाचनालयाला अवश्य भेट द्या
जामखेड प्रतिनिधी
मनाला शांतता, स्थिरता वाचनाने मिळते. आपल्या जीवनात वैयक्तिक व वैज्ञानिक दृष्ट्या वाचन हे खूप महत्त्वाचे आहे.वाचनाने जीवनाला दिशा मिळते. पुस्तकं वाचल्यावर माणसं वाचनं, कळणं सोपे जाते असे म्हटले तर वावगे ठरू नये. असे लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष रमेशभाऊ गुगळे यांनी सांगितले.
पुस्तकं वाचून झाल्यावर माणसाने माणसाचं मन वाचावं. कारण जे पुस्तकांच्या पानात नसतं ते माणसाच्या मनात असतं…!”
जामखेड व जामखेड परिसरातील जिज्ञासू वाचकांना एक आनंदाची बाब म्हणजे जामखेडचे रहिवासी कै. लक्ष्मण महादेव भिडे जामखेड परिसरातील भौगोलिक व ऐतिहासिक अत्यंत परिश्रमपूर्वक अभ्यास करून “जामखेडच्या परिसरात”पुस्तक तयार केलेले आहे. ते अतिशय दुर्मिळ असून त्यांचे सुपुत्र मुकुंद लक्ष्मण भिडे मो (9511747211) वसई निवासी यांनी लोकमान्य वाचनालयाला भेट दिले आहे.
याचा वाचकांनी जरूर फायदा घ्यावा.जामखेडचे वैभव 135 वर्षे जुने असलेल्य लोकमान्य वाचनालयात अशा प्रकारचे सर्व क्षेत्रातील हजारो ग्रंथ वाचनालयात उपलब्ध आहेत, तरी पुस्तक वाचन शौकीनांनी एक वेळेस अवश्य भेट द्यावी.
तसेच
लोकमान्य वाचनालयातील पुस्तकांबाबत माहिती घेण्यासाठी खालील फोन नंबरवर संपर्क साधावा असेही आवाहन लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष रमेशभाऊ गुगळे यांनी केले आहे.
संपर्क -9689711372
9689104020
8308424249
सोशलमीडियाच्या युगातही पुस्तक वाचणे महत्वाचे – : रमेशभाऊ गुगळे लोकमान्य वाचनालयाला अवश्य भेट द्या
RELATED ARTICLES






